नेवासा दि.१६ ऑगस्ट
नेवासा तालुका पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलीस निरीक्षक बाजीराव पोवार आणि एका मोठ्या दैनिकाच्या प्रतिनधी विरुद्ध नेवासा पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल झाला असून या प्रकारा मुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. या प्रकरणाचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी संदिप मिटके हे करत आहेत.
जानकू रामभाऊ कोकरे वय 65 वर्ष धंदा मजुरी राहणार राहुरी कॉलेज जवळ राहुरी तालुका राहुरी यांच्या फिर्यादीवरून भादवी-384,385,34 प्रमाणे सुनील गर्जे राहणार कुकाना ता.नेवासा आणि बाजीराव महादेव पवार यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेची हकीकत अशी की जानकू रामभाऊ कोकरे यांच्या नातेवाईकांवरोधात नेवासा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता. या गुन्ह्यात गंभीर कारवाई होऊ द्यायची नसेल तर दीड लाख रुपयांची मागणी तत्कालीन पोलीस निरीक्षक बाजीराव पोवार यांनी एका पत्रकारा मार्फत केली होती.आणि ती रक्कम फिर्यादी कडून घेऊन पोलीस निरीक्षकांना देण्यात आल्याची फिर्याद नेवासा पोलीस ठाण्यात नोंदवण्यात अली आहे. ही घटना . 11/05/20220रोजी घडली होती त्या नंतर याबाबत जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन देण्यात आले होते.