Home शहर नगर शहरात या प्रसिद्ध हॉटेल मध्ये लागली आग..

नगर शहरात या प्रसिद्ध हॉटेल मध्ये लागली आग..

अहमदनगर दिनांक २५ डिसेंबर

अहमदनगर शहरातील माळीवाडा बस स्थानकासमोर असलेल्या हॉटेल पंचरत्न वरील भागात आग लागल्याची घटना घडली असून घटनास्थळी अहमदनगर महानगरपालिकेचे अग्निशामक दलाची टीम पोहोचली असून आग विझवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.

इम्पेरियल चौकामधील हॉटेल पंचरत्न या हॉटेलच्या वरील मजल्यास आग लागल्याची घटना घडली आहे या भागात जवळपास सर्व हॉटेल एकमेकांना चिटकून असल्यामुळे आग भडकण्याची आधीच अग्नीशामक दलाने धाव घेतल्याने आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशामक दलाला यश आले आहे.

आज नेमकी कशामुळे लागली याबाबत अद्याप माहिती मिळाली नसून धूर येत असल्यामुळे काही नागरिकांनी लगेच अग्निशामक दलाला फोन करून ही माहिती दिल्यामुळे अग्निशामक दलाची गाडी वेळेवर घटनास्थळी पोहचून आग विझवण्यासाठी प्रयत्न केले त्यामुळे पुढील अनर्थ टळला आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version