Homeशहरखोटं सोने प्रकरण रंगा बिल्लाचे कारनामे अनेक बँका पतसंस्थांना घातली टोपी ?

खोटं सोने प्रकरण रंगा बिल्लाचे कारनामे अनेक बँका पतसंस्थांना घातली टोपी ?

advertisement

अहमदनगर दि. 12 सप्टेंबर –
अहमदनगर शहरातील एका सहकारी बँकेत(cooperative bank ) खोटे सोने(fake gold ) ठेऊन त्यावर लाखो रुपयांचे कर्ज घेतल्याप्रकरणी काही लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र हा प्रकार एक त्या बँकेपुरता मर्यादीत नसून यातील रंगाबिल्लाने अनेक बँका पतसंस्थांना (banks and credit institutions ) गंडा घातल्याची माहिती समोर येत आहे.

सुमारे दीड कोटी (one and a half crore ) रुपयांपर्यंतची फसवणूक असल्याची धक्कादायक माहिती आता हळूहळू समोर येत आहे. या रंगा बिल्ला जोडीने नगर शहर ,भिंगार ,नगर तालुका मधील अनेक पतसंस्थांना गंडा (cheated) घालून काही लोकांच्या नावे खोटे सोने ठेवून लाखो रुपयांचे कर्ज प्रकरणे केले आहेत.

ज्या लोकांना पैशांची गरज आहे अशा लोकांना हेरून आपलं सोनं तुमच्या नावाने गहाण ठेवून तुम्हाला पैसे देतो असे सांगून समोरच्याच्या गरजेचा फायदा घेऊन हे रंगा बिल्ला बँकेत, पतसंस्थेत सोनं घाण ठेवत असे यासाठी एक मोठी साखळी असल्याची माहिती असून गरजवंताच्या नावे लाखो रुपये घेऊन त्यांच्या गरजेपुरते पैसे त्यांना देत असत आणि बाकीचे पैसे हे स्वतः ठेवत असत अशी माहिती आता समोर येत आहे. जेव्हा काही लोकांना या प्रकरणाची माहिती कळली तेव्हा त्यांनी बँकेत पैसे भरून खोटे सोने सोडून घेतले आपल्यावर केस होऊ नये अथवा बदनामी होऊ नये या भीतीने काही लोकांनी लाखो रुपये भरलेले आहेत.

मात्र आता रंगा बील्लाचे कारनामे उघड झाल्याने आता हळूहळू नागरिक समोर येऊ लागले आहेत. काही दिवसातच हे नागरिक पोलीस स्टेशनमध्ये तक्रार देण्यासाठी जाणार असल्याची माहिती समोर येत आहे.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular