अहमदनगर दि.३० सप्टेंबर
बनावट सोनेतारण कर्ज प्रकरणात दिवसेंदिवस या कर्ज प्रकरणाची व्याप्ती वाढत असून कर्ज प्रकरणातील रक्कम आणि बनावट सोन्याचे वजन रोजच वाढत आहे. गुरुवारी पोलिसांनी केलेल्या तपासामध्ये शहर सहकारी बँकेच्या एका संशयित खात्यामध्ये आठ लाख 40 हजार रुपयांचे रकमेचे पंचवीस तोळे बनावट सोने आढळून आले. तर श्री संत नागेबाबा मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह सोसायटी मधील नऊ संशयित खात्यांमध्ये 60 तोळे बनावट सोने पोलिसांच्या तपासात आढळून आले आहे. त्यामुळे या बनावट सोने तारणाची व्याप्ती किती मोठी आहे हे लक्षात येत आहे.
सध्या पोलीस काही पकडलेल्या आरोपींच्या संपर्कातील काही फरारी साथीदारांच्या शोधात असून ते सापडल्यानंतर अजून शहरातील काही बँकेमध्ये किंवा पतसंस्थांमध्ये बनावट सोने ठेवले आहेत का याबाबत माहिती पुढे येणार आहे. गुरुवारी पोलिसांनी शहर सहकारी बँक आणि श्री संत नागेबाबा मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह सोसायटीमध्ये तपासणी केली होती यामध्ये मोठ्या प्रमाणावर बनवणे मिळून आले आहे.
या प्रकरणाचा तपास कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संपत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक गजेंद्र इंगळे , पोना.बापुसाहेब गोरे, पोकॉ गणेश ढोबळे, पोहेकॉ दिपक बोरुडे व गुन्हे शोध पथकातील अंमलदार पोना सलिम शेख, बंडू भागवत, पोकॉ सुमित गवळी, करत आहेत.