अहमदनगर दि.३ मे
एक मे म्हणजेच महाराष्ट्र दिन महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून अहमदनगर शहरातील नगरकरांना एक आगळा वेगळा फॅशन शो सादर करून दर्जेदार व दिमाखदार रॅम्प वाक प्रत्यक्ष पाहण्याची संधी सरस्वती हॉस्पिटल
प्रस्तुत महावीर अहमदनगर फॅशन रनवे 2022 ने दिली होती.
पारंपरिक महाराष्ट्रीयन संस्कृती दर्शवणारी मराठमोळी साडी, जोडीला नाजूक कलाकुसर असलेले दागिने परिधान करून रॅम्पवर महिलांचे आगमन झाले. युवतींनीही पारंपरिक व आधुनिक फॅशनचा अनोखा संगम असलेले पेहराव परिधान केले होते. प्रत्येकाच्या एंट्रीला उपस्थितांची मोठी दाद मिळाली. पुरुषांनी महाराष्ट्राचा पारंपरिक पेहराव परिधान करीत रूबाबदार रॅम्प वाक केला. आई व मुली या जोडीच्या रॅम्प वाकने दोन पिढ्यांमधील घट्ट बंध सर्वांसमोर आले. एका मोठ्या व्यासपीठावर वेगळ्या पध्दतीने एकत्र येण्याची संधी मिळाल्याने दोघींच्याही चेहऱ्यावर झळकणारा आनंद व आत्मविश्वास सर्वांनाच प्रचंड आवडला. गरोदर मातांनीही अतिशय आत्मविश्वासाने व प्रफुल्लीत करणाऱ्या उत्साहात पारंपरिक व आधुनिकतेचा संगम साधणारा ऐटदार रॅम्प वॉक सादर केला. कपल रॅम्प वाकमध्येही जोडीदारांनी अतिशय सुंदर सादरीकरण करीत उपस्थितांची वाहवा मिळवली.
या कार्यक्रमात स्वागत करताना डॉ.अमोल जाधव म्हणाले की, आताच्या काळात दूरचित्रवाणी, इंटरनेटमुळे जगभरातील फॅशन शो, तेथील मॉडेल्सचे सादरीकरण सर्व जण पाहत असतात. नगर शहरातही असा आधुनिक काळातील फॅशन शो घ्यावा, स्थानिक टॅलेंटला
व्यासपीठ मिळावे हा उदात्त उद्देश समोर ठेवून फॅशन
कार्निव्हलमार्फत हा शो आयोजित केला. महाराष्ट्र दिनाचे
औचित्य साधून मराठमोळ्या संस्कृतीचेही दर्शन येथे घडले.
मॉडेलिंग क्षेत्रात करियर करू इच्छिणाऱ्यांना स्थानिक
पातळीवरच व्यासपीठ मिळाल्याने त्यांचाही आत्मविश्वास
नक्कीच दुणावला असेल.
महावीर ग्रुपचे राजेश भंडारी म्हणाले की, नगरमध्ये पुण्यामुंबईच्या धर्तीवर फॅशन शो होवू शकतो याची प्रचिती तमाम नगरकरांना आज आली. प्रचलित व पारंपरिक फॅशन सर्वांना या माध्यमातून कळली. सर्वात महत्त्वाचे म्हणजे जवळपास 150 स्थानिकांना या फॅशन रनवेमुळे रॅम्प वाकची संधी मिळाली. अनेकांची स्वप्नपूर्ती यानिमित्ताने झाली असेल.
नगर शहरातील नंदनवन लॉन्स येथे चार तास रंगलेला हा फॅशन रनवे पाहून अनेकांना आपण कोणत्या तरी मोठ्या महानगरांत आलिशान वातावरणात असल्याची अनुभूती आली.
यावेळी सर्वांनाच समावून घेणारा फॅशन शो आयोजित
केल्याबद्दल सर्वांनी सरस्वती हॉस्पिटल, डॉ.अमोल जाधव यांचे कौतुक केले. अशा उपक्रमातून नगरची एक वेगळी सांस्कृतिक ओळख जगासमोर जात आहे, अशा भावना अनेकांनी व्यक्त केल्या.