Homeराजकारणभाजपच्या माजी आमदारावर प्राणघातक हल्ला शिवसेनेच्या आमदारावर आरोप नगर जिल्ह्यातील प्रकार

भाजपच्या माजी आमदारावर प्राणघातक हल्ला शिवसेनेच्या आमदारावर आरोप नगर जिल्ह्यातील प्रकार

advertisement

नेवासा दि.१७ ऑगस्ट

नेवासा तालुक्यातील पाचेगाव येथील प्रवरा नदीवरील पुलाच्या उदघाटन कार्यक्रम वरून नेवासा तालुक्यातील दोन राजकारण्यां मध्ये चांगलीच जुंपली असून पुलाच्या उदघाटन कार्यक्रमा आधी माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांच्या सह त्यांच्या कार्यकर्त्यांवर प्राणघातक हल्ला करण्याचा प्रयत्न केला असल्याचा आरोप भाजपचे माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी फेसबुक लाईव्ह वरून कार्यकर्त्यांशी संवाद साधत असताना केला आहे. यामुळे नेवासा तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. फेसबुक लाईव्ह दरम्यान भाजपचे माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी थेट शिवसेनेचे आमदार शंकराव गडाख यांच्यावर आरोप केला असून त्यांनी त्यांच्या समर्थांकारवी आमच्यावर प्राण घातक हल्ला केल्याचं माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी सांगितल आहे.

तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्या कार्यकाळात तत्कालीन जलसंधारण मंत्री गिरीश महाजन यांनी पाचेगाव येथील पुलास मंजुरी देऊन निधी दिला होत. या पुलाचे काम आता पूर्णत्वास आले असून या पुलाचा उद्घाटन कार्यक्रम शिवसेनेचे आमदार शंकराव गडाख यांनी ठेवला होता. मात्र काही काम अपूर्ण असल्याने आणि दुसऱ्या कामाचे श्रेय घेत असल्याने या प्रकाराचा निषेध करण्यासाठी माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी कार्यक्रमास्थळी जाऊन निषेध नोंदवण्याचा प्रयत्न केला. मात्र यावेळी शंकरराव गडाख यांच्या काही गुंड कार्यकर्त्यांनी जीवघेणा हल्ला केला असल्याचा आरोप माजी आमदार भानुदास मुरकुटे यांनी केला आहे.

 

 

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular