Homeक्राईमस्वयंघोषित पत्रकार इस्माईल दर्यानी वर दुसरा खंडणीचा गुन्हा दाखल...

स्वयंघोषित पत्रकार इस्माईल दर्यानी वर दुसरा खंडणीचा गुन्हा दाखल…

advertisement

अहमदनगर दिनांक २९ जून
माजी आमदाराला एक कोटी रुपयांची खंडणी मागणाऱ्या ईस्माईल दर्यानी उर्फ भैय्या बॉक्सर याच्यावर भिंगार पोलीस ठाण्यात अजून एक खंडणीचा गुन्हा दाखल झाला असून कापड व्यावसायिक अकिब उर्फ अतिक मोहमंद शेख यांनी हा गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत हकीकत अशी की आतिक शेख आणि इस्माईल दर्यनी याची ओळख झाल्यानंतर काही दिवसानंतर इस्माईल उर्फ भैया बॉक्सर याने अतिक शेख यांना फोन करून तुम्ही काय धंदे करतात हे मला माहित आहे या सर्व धंद्याची माहिती मी माझ्या चॅनलवरून प्रसारित करेल बातमी प्रसारित करायची नसेल तर मला पावणे चार लाख रुपये दे अन्यथा बातमी करून समाजात बदनामी करेल अशी धमकी दिली. यानंतर अतीक शेख यांनी इस्माईल दर्याने यास तीस हजार रुपये दिले.मात्र पैशाची चटक लागलेल्या इस्माईल याने पुन्हा अतीक शेख यांना 45 हजार रुपयांची मागणी केली आणि तो चालवत असलेल्या एका युट्युब चॅनेलवरून अतीक शेख यांच्या विरोधात खोट्या बातम्या देऊन बदनामी करण्यास सुरुवात केली. याबाबत अतीक शेख यांनी इस्माईल दर्याने याची भेट घेऊन बदनामी का करतो मी असे कोणतेही धंदे करत नाही अशी विचारणा केली असता पैशाची चटक लागलेल्या इस्माईल दर्यांनी याने मला अजून साडेतीन लाख रुपये अन्यथा तुझी बदनामी करून मी तुला वेळप्रसंगी मारून टाकेल अशी धमकी दिली.

मात्र हे प्रकरण सुरू असतानाच इस्माईल दर्याने याच्यावर माजी आमदार भीमराव धोंडे यांनी एक कोटी रुपयांची खंडणी मागितलेचा गुन्हा दाखल केला आणि त्याचवेळी भिंगार पोलीस स्टेशनमध्ये अतीक शेख यांनी फिर्याद देऊन इस्माईल दर्याने उर्फ भैया बॉक्सर यांच्या विरोधात दुसरा खंडणीचा गुन्हा दाखल केला असून भिंगार पोलीस ठाण्यात भादवि कलम384, 386 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पीएसआय साळुंके हे करत आहेत.

याच प्रमाणे अहमदनगर शहरातील बाजारपेठेतील तीन ते चार व्यापारी खंडणीचा गुन्हा दाखल करणार असल्याची चर्चा असून काही व्यापाऱ्यांनी कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये येऊन याबाबत माहिती दिली आहे त्यामुळे अजूनही काही गुन्हे दाखल होण्याची शक्यता आहे.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular