अहमदनगर दि.७ मे
अहमदनगर शहरातील कायनेटिक चौक परिसरातील एका पत्त्याच्या क्लबचा फेसबूक लाईव्ह करून नगर शहरातील अवैद्य धंदे यांबाबत पोलखोल करणाऱ्या संदीप भांबरकर यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे. तोफखाना परिसरातील एका महिलेने संदीप भांबरकर यांच्यावर गुन्हा दाखल केला असून तोफखाना पोलीस ठाण्यात याबाबत फिर्याद देण्यात आली आहे.
संदीप भांबरकर यांच्या विरुद्ध दिलेल्या फिर्यादीत त्यांनी एका घरात घुसून महिलेला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले आहे. तसेच त्या महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र ओढून चोरण्याचा प्रयत्न केल्याचं फिर्यादी मध्ये म्हटले आहे.
महिलेच्या फिर्यादी नुसार तोफफखाना पोलीस स्टेशनमध्ये संदीप भांबरकर यांच्याविरोधत भादवि कलम 394,354ब ,452,504,506, प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला आहे