Homeक्राईमकीर्ती भेटेला मारणाऱ्या महेश भेटे याच्या पोलीस भावासह आई वडिलांवर अॅट्रोसिटी कायदयानुसार...

कीर्ती भेटेला मारणाऱ्या महेश भेटे याच्या पोलीस भावासह आई वडिलांवर अॅट्रोसिटी कायदयानुसार गुन्हा दाखल करा अन्यथा पोलीस अधीक्षक कार्यालयात मृत्यूदेह आणून ठेवणार आंबेडकरी समाज बांधवांचा इशारा

advertisement

अहमदनगर दि.७ ऑक्टोबर
अहमदनगर शहरातील तपोवन रोड भागातील भिस्तबाग येथे तीन ऑक्टोबर रोजी जावयाने आपल्या पत्नीला आणि सासर्‍याला मारहाण करून गंभीर जखमी केल्याची घटना घडली होती त्यानंतर या दोन्ही गंभीर जखमींचे आज सकाळी पुणे येथे उपचार चालू असताना निधन झाले आहे.

या मारहाणीत कीर्ती भेटे आणि विश्वनाथ कसबे गंभीर झाले होते तर कसबे यांचा जावई महेश भेटे याने हे कृत्य केले होते . याप्रकरणी तोफखाना पोलीस स्टेशनमध्ये महेश भेटे यांच्याविरुद्ध कीर्ती भेटे हिच्या आईने गुन्हा दाखल केला आहे.मात्र या गुन्ह्यात मोहन माणिक,मंगल माणिक भेटे यांना सहआरोपी करून अॅट्रोसिटी कायदयानुसार कारवाई करावी अशी मागणी आंबेडकरी चळवळीतील समाज बांधवांनी जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्याकडे निवेदन देऊन केली आहे

पत्नी आणि सासऱ्याला मारहाणीच्या गुन्ह्यात महेश
माणिक भेटे यास अटक करण्यात आली. परंतु त्याला
सहकार्य करणारे व मुलीस वारंवार जाती वरून त्रास देणारे आरोपीचा भाऊ मोहन माणिक भेटे याने वेलेवेळी आरोपील समजवण्याचा प्रयत्न करण्या ऐवजी पाठबळ देऊन निघूर्ण कृत्य करण्यास भाग पाडले. तसेच आरोपीची आई मंगल माणिक भेटे हीने वेळोवेळी मुलीस व कसबे कुटूंबास मानसिक शारिरिक छळ करुन आरोपीच्या पाठीशी उभी राहिली. त्यामुळे या गुन्ह्यात आरोपी व त्याचा भाऊ मोहन माणिक भेटे मंगल माणिक भेटे व माणिक भेटे यांचे घटना घडण्यापूर्वी व घडल्यानंतरचे मोबाईल वरील सर्व कॉल रेकॉर्ड त्वरित तपासण्यात यावे खुनाच्या गुन्हयात अप्रत्यक्ष मदत करुन, आरोपीस पाठीशी घातले त्यामुळे मोहन थिटे, मंगल माणिक थिटे, व आरोपीचे वडील माणिक भिटे यांच्यावर अॅट्रोसिटी अॅक्ट कायद्यानुसार गुन्हा दाखल करून आरोपींना त्वरित अटक करावी. अन्यथाः दोन्हीही मृत्यूदेहांवर अंत्यविधी न करता एसपी कार्यालयासमोर मृतदेह आणुन ठेवण्यात येतील असा इशारा निवेदनात देण्यात आला आहे.

पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांना निवेदन देताना.अजयश्व साळवे, तुकाराम गायकवाड, रोहित (बंडू) आव्हाड, दिपक मोहीते, समीर शेख, मनोज प्रभुणे,चंद्रकांत भिंगारदिवे, सुमेध गायकवाड, जहीर शेख, ललित गोरडे ,घासर शेख,सुशील गायकवाड, अल्लाफ कुरेशी ,सोमा शिंदे योगेश थोरात, निलेश साळवे, संतोष जाधव,निलेश बनसोडे, जय चक्रनारायणे, मंगेश तिजोरे, रोहन गोरखा, बबलू विश्वल गायकवाड, अमित काळे,
किरणदाभाडे आधी समाज बांधव उपस्थित होते

 

या घटनेबाबत अपर पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल हे संपूर्ण घटनेची चौकशी करतील आणि या चौकशीत पोलीस खात्यातील कर्मचाऱ्यांचा सहभाग आढळून आल्यास आणि कुटुंबीयांचा सहभाग आढळून आल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई करणार -मनोज पाटील पोलीस अधीक्षक

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular