Homeक्राईमअखेर मराठा समाजाबद्दल अतिशय घृणास्पद व आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या निलंबित पोलीस निरीक्षक...

अखेर मराठा समाजाबद्दल अतिशय घृणास्पद व आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या निलंबित पोलीस निरीक्षक किरण कुमार बकाले याच्यावर गुन्हा दाखल

advertisement

जळगाव दिनांक 15 सप्टेंबर

जळगाव जिल्ह्याचे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण कुमार बकाले यांनी आपल्या सहकार्याबरोबर फोनवर बोलताना मराठा समाजाबद्दल अत्यंत खालच्या स्थराला जाऊन भाष्य केले होते. त्यानंतर या दोघांमध्ये संभाषण झालेली ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती. या मुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाकडून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे . किरण कुमार बकाले याच्यावर सध्या निलंबनाची कारवाई करण्यात आली असून किरण कुमार बकाले याच्यावर बडतर्फीची कारवाई करावी अशी मागणी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहे. या प्रकारानंतर जळगाव येथील जिल्हापेठ पोलीस स्टेशन मध्ये किरणकुमार बकाले याच्या विरोधात भा.द.वि. १५३-A, १५३-B. १६६. २९४,५००, ५०९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


बांधकाम व्यावसायिक विनोद पंजाबराव देशमुख यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.किरण कुमार बकाले हे स्थानिक गुन्हे शाखेत सरकारी नोकरी व जबाबदार पदावर असतांना आपले सहकारी अंमलदाराशी फोनवर बोलतांना मराठा समाजाबद्दल अतिशय घृणास्पद व आक्षेपार्ह वक्तव्य करुन मराठा समाजामध्ये द्वेषाच्या व दुष्टत्वाच्या भावना वाढविण्याचा प्रयत्न केला. तसेच सार्वजनिक शांतता बिघडविण्याचा प्रयत्न केला कोणत्याही जात धर्मांचे स्त्रियांचे कानावर अश्लिल शब्दांचा उच्चार करुन त्यांना लज्जा उत्पन्न होईल असा उच्चार व शब्दप्रयोग केला म्हणुन गुन्हा दाखल करण्यात करण्यात आला आहे.

 

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular