अहिल्यानगर दिनांक 5 जानेवारी
जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याबद्दल नगर शहरातील अस्लम शेख ला नगरच्या स्थानिक गुन्हे शाखेने ताब्यात घेतली असून अस्लम याच्यावर पुणे जिल्ह्यातील शिक्रापूर पोलीस ठाण्यात 17 एप्रिल 2024 रोजी तीन जणांना जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याबद्दल गुन्हा दाखल केला होता मात्र तेव्हापासून अस्लम हा फरार होता. असलम शेख नगर शहरातील प्रसिद्ध व्यावसायिक अफजल शेख यांचा भाऊ आहे.
याबाबत थोडक्यात हकीगत अशी की प्रविण पंढरीनाथ सोनवणे हे मूळचे पारनेर तालुक्यातील असून पुणे येथे एका कंपनीमध्ये नोकरीस आहेत 16 एप्रिल रोजी ते पुण्यावरून नगर येथे येत असताना वाघोली जवळ ट्राफिक जाम असल्यामुळे सोनवणे यांच्या पत्नीने गाडी हळूहळू पुढे घेत असताना एक पांढ-या रंगाची फोर्ड कंम्पनिची “इंडेव्हर गाडी चालली होती. तिने अचानक सोनवणे यांच्या गाडीला आडवी गाडी लावली. याबाबत सोनवणे यांनी गाडीतूनच त्या लोकांना गाडी पुढे का लावली याबाबत विचारले असता त्या गाडीमधील तीन जण उतरले आणि त्यांनी अस्लम भाई नाम हे मेरा क्या उखाडेगा असे म्हणुन त्याने सोबत असणा-या एकाला फिरोज जरा ले रे इसको असे म्हणून फ़िरोज आणि अस्लम यांनी सोनवणे यांना लाथा बुक्क्यानी मारहाण केली व शिवीगाळ करुन ते पुढे गाडी घेवुन निघुन गेले. त्यानंतर सोनवणे आपल्या पत्नी व मुलासह पाठीमागुन निघाले त्यावेळी पुन्हा त्या इंडेव्हर कारने लोणीकंद गावाजवळ एका HP पेट्रोलपंपाच्या पुढे अचानक गाडी थांबवली त्यामुळे सोनवणे यांच्या पत्नीला गाडी न आवरल्याने सोनवणे यांची कार इंडेव्हर कारचे पाठीमागे जावुन धडकली त्यानंतर इंडेव्हर कार ही पुढे निघुन गेली.
हा प्रकार घडल्याने सोनवणे यांनी त्यांचे मित्र विपुल शितोळे यांना फोन करून सर्व हकीगत सांगितली शितोळे यांनी तातडीने सोनवणे यांच्याकडे धाव घेऊन हे सर्वजण पुन्हा नगर कडे निघाले असताना चाकण चौकाच्या पुढे नदीच्या पुलावर रात्रौ 10.30 वा ते 11.00 वा चे दरम्यान पुन्हा इंडेव्हर कार चालकाने गाडी आडवी लावुन सोनवणे यांची गाडी थांबवुन त्यामधील तिघांनी तसेच पाठीमागुन आलेल्या इर्टीका कार मधून उतरुन माझे मित्राला का मार दिला म्हणुन शिवीगाळ करु लागले तसेच विपुल हनुमंत शितोळे व प्रसाद शामराव नाले यांनी शिवीगाळ का करता असे विचारल्यानंतर अस्लम नावाच्या व्यक्तीने त्याच्या हातातील लाकडी दांडक्याने सोनवणे यांना आणि शितोळे यांना लोखंडे रोडने मारहाण करण्यास सुरुवात केली तसेच गाड्यांची मोडतोड करून सर्वजण पळून गेले.याप्रकरणी शिक्रापूर पोलीस ठाण्यात असलम शेख आणि त्याच्या साथीदारांविरुद्ध जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला होता मात्र तेव्हापासून असलम शेख हा फरार होता असलम शेख हा नगर मधील अफजल शेख यांचा भाऊ असून अफजल शेख याच्यावरही मध्यंतरी रामवाडी येथे झालेल्या महाराणी प्रकरणात एक गुन्हा दाखल झाला होता आता अस्लम यास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले असून पुढील कारवाईसाठी ते शिक्रापूर पोलिसांच्या ताब्यात देणार आहेत.