Homeक्राईमदेख कल गोली नही चलाई, अगली बार सिधे ठोक देंगे,.... नगर शहरातील...

देख कल गोली नही चलाई, अगली बार सिधे ठोक देंगे,…. नगर शहरातील व्यापाऱ्यास धमकी.. व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण..

advertisement

अहिल्यानगर दिनांक 18 डिसेंबर

अहिल्यानगर मधील बेकरी प्रॉडक्टच्या
रॉ मटेरियल विक्रीचा व्यवसायिकास चित्रपट स्टाईलने पाठलाग करून डायलॉग मारत जीवे मारण्याची धमकीत दिल्याचा प्रकार समोर आला आहे.

जुने दाणे डबरा परिसरात बेकरी आणि रॉ मटेरियल चा व्यवसाय असणाऱ्या दर्शन सेल्सचे मालक किरण मोहनलाल रांका यांना नगर शहरातील अप्पू हत्ती चौकात दुचाकीवरून आलेल्या दोन जणांनी जीवे मारण्याची धमकी दिली आहे. ‘भाई का फोन आयेगा, उठा लें’, असे म्हणत, तसेच मोबाईलवर ‘चंद रुपयो के लिये तुम अपनी जान दाव पर नही लगाओगे’, असा मेसेज पाठवत जीवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी किरण मोहनलाल रांका यांच्या फिर्यादीवरून तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

१४ डिसेंबर रोजी रात्री पावणेनऊ वाजता दुकान बंद करुन सर्जेपुरा चौक, अप्पू हत्ती चौक मार्गे घरी जात असतांना अप्पू हत्ती चौकाजवळ त्यांच्या दुचाकीचा दोघांनी पाठलाग करून त्यांना आवाज देऊन रस्त्यात थांबवले. दुचाकीवरील एकाने भाई का फोन आयेगा उठालो, असे म्हणत दोघे तेथून निघून गेले. त्यांच्या हातात नळकांडी सारखे काहीतरी होते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी १५ डिसेंबर रोजी दुपारी त्यांच्या मोबाईलवर टेक्स्ट मेसेज आला. ‘देख कल गोली नही चलाई, अगली बार सिधे ठोक देंगे, इसे महज एक धमकी समझके हमे हलके मे लेगा, हमसे गुस्ताखी करेगा तो यकीनन जान से जाएगा, हमारे बंदो को अंदर करेगा, तो तुझे छोड़ देंगे क्या? वो तो आजकल मे बाहर होंगे, लेकीन तुझें जहाँनुम पहुचाकर ही रहेंगे, कब तक छुपेगा, कहा तक भागेगा, पुलिस भी आखिर कब तक तुझको बचा लेगी ? कही भी, कभी भी जहा मिला वही तेरी कबर खोद देगे, इस गलतफैमी मे बिलकुल भी मत रहना के पुलिस या कोई पॉलिटिशियन तुमको बचा लेगा, क्युंकी सब देखते रह जाएंगे और हमारी गोली तेरे अंदर होगी, हमे गोली चलाने पर मजबूर मत कर, वरना खून के आसू रोएगा ये हमारा वादा है, तेरे लिये बेहतर होगा के बिना किसी खून खराबे के हमारी बात मान और अपनी जान बचा, तू ये मोबाईल और सिम फर्जी है और आगे भी जो कूछ मिलेगा वो भी फर्जी होगा, इस लिये हम उम्मीद करते है के चंद रुपयो के लिये तुम अपनी जान दाव पर नहीं लगाओगे’, असा मेसेज आला.

त्यानंतर त्याच मोबाईल नंबरवरुन फोन आला व त्यावर बोलणारा इसम ‘मेसेज पढा क्या, भाई का फोन आयेगा उठाव’, असे म्हणाला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणी तोफखाना पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular