Homeविशेषएका चोरीला गेलेल्या गाडीची अशीही कहाणी..

एका चोरीला गेलेल्या गाडीची अशीही कहाणी..

advertisement

अहमदनगर दि.१७ जुलै
एका चारचाकी गाडी एक महिन्यांपूर्वी चोरीला गेली होती गाडी शोधूनही सापडत नसल्याने अखेर गाडी मालकाने गाडी चोरीला गेल्याची तक्रार पोलिसात दिली.

पोलिसात तक्रार दिल्या नंतर तपास सुरू झाला एका जिल्ह्याच्या तपास पथकाने तपास करत असताना ही गाडी मराठवाड्यात सापडली गाडी सापडल्या नंतर गाडीची दुसरी कहाणी सुरू झाली गाडी सापडल्या नंतर मालकाला गाडी ओळखण्यासाठी बोलवले गेले मालकाने गाडी ओळखली आणि गाडी सापडणाऱ्या लोकांचे आभार मानले त्याचा आनंद गगनात मावेना मात्र आनंद काही क्षणच टिकला कारण गाडी आणण्यासाठी सपडण्यासाठी एक लाख खर्च आला असा निरोप गाडी मालकाच्या कानावर पडला आणि तो चक्रावून गेला हो नाही म्हणता म्हणता अखेर पन्नास हजार रुपयांवर मांडवली झाली.अत्यंत जड मनाने मलकाने पैसे दिले त्याला वाटले चला गाडी तर परत मिळाली म्हणून तो आनंदाने घरी गेला गाडी चोरीची तक्रार दिल्याने गाडी परत मिळवण्यासाठी न्यायालयात जाऊन सर्व कायदेशीर बाबी पूर्ण करून गाडी परत मिळणार होती म्हणून त्यांने सर्व कागदपत्रे सादर केली न्यायालयाच्या आदेशानंतर आता गाडी परत मिळेल म्हणून मालक खुश होता मात्र त्याला पुन्हा दुसरा धक्का बसला.

कारण गाडी मालकाला दुसरा निरोप आला होता गाडी परत मिळवण्यासाठी काही हजार रुपये खर्च द्यावा लागेल ! मालकाला प्रश्न पडला पन्नास हजार रुपये खर्च झाल्यानंतर आता हा दुसरा खर्च कशासाठी असेल त्यानंतर त्याला लक्षात आले तो खर्च मोठ्या ऑफिसचा होता आता गाडी छोट्या ऑफिसमध्ये आली आहे.त्या ठिकाणी सुद्धा खर्च द्यावा लागेल त्यामुळे आता मालक चिंतेत आहे हा खर्च देऊन गाडी सोडून घ्यावी की आहे तिथेच सोडून द्यावी अशा मनस्थितीत मालक सध्या न्यायालयाच्या चकरा मारत आहे.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular