अहिल्यानगर दिनांक ७ जुलै
नगर मनमाड रोडवरील एक मोक्याची जागा गिळंकृत करण्याचा डाव सध्या सुरू असून यामध्ये धक्कादायक गोष्ट म्हणजे सर्वच कागदपत्रे संशयास्पद आहेत. त्यामुळे महसूल विभागासह दुय्यम निबंधक विभाग नेमका झोपा काढतो का काय असा प्रश्न उपस्थित होत आहे.
हाडांचा कारखाना म्हणून अनेक वर्षे लोकांना माहीत असलेली जागा नगर मनमाड रोड वर असून याचे मालक अब्दुल अजीज डायाभाई, डायाभाई अब्दुल अजिज आणि कासम अब्दुल अजीज हे तीन मालक उताऱ्यावर होते. 13/07/1992 मध्ये फेरफार क्रमांक 14676 नुसार खाते फोड प्रमाणे होते.
मात्र यामध्ये गंमत म्हणजे 15 /10/1991 रोजी यामधील मालक असलेले अब्दुल अजीज डायाभाई
यांनी गांधीनगर गुजरात येथील पारसमल मश्रीमल शहा यांना ही जमीन एक लाख नव्वद हजार रुपयांना विकल्याचे खरेदीखत करण्यात आलेले आहे. विशेष म्हणजे खरेदीखत करत असताना 90 हजार रुपये रोख घरी घेतले अशी ही नोंद या खरेदीखता मध्ये नमूद करण्यात आली आहे. तर मूळ रक्कम एक लाख 90 हजार रुपये हे चेकने दिले असल्याचे नमूद करण्यात आले आहे. यात संशयास्पद गोष्ट अशी की त्या काळी स्टॅम्प ड्युटी तिकीट लावून भरली जात असे तर या खरेदीखतावर वीस वीस रुपयांचे पाचशे रुपयांचे आणि हजार रुपयांचे असे काही टिकीट आहेत जर खरेदी खताची रक्कम पहिली तर त्याकाळी आठ टक्के स्टॅम्प ड्युटी नुसार तेवढी तिकीट लावलेले नाहीत ही एक मोठी संशयास्पद गोष्ट समोर आलेली आहे.
याच्यात मूळ मुद्दा म्हणजे ज्या दस्ताद्वारे ही खरेदी झालेली आहे त्याचा अनुक्रमांक पहिल्या पानावर वेगळा आणि शेवटच्या पानावर वेगळा आलेला आहे.
ही पण गोष्ट संशयास्पद दिसून येत आहे.
1991 साली या जागेच्या मालकांपैकी एकाने गुजरातच्या शाहला खरेदी दिली त्या खरेदी खतावर इतर दोन मालकांची नावे अथवा त्यांचा कोणताही उल्लेख आढळून येत नाही. मग त्या जागेच्या उताऱ्याची खाते फोड 1992 मध्ये कशी झाली. त्यामुळे 1992 चे खाते फोड महसूल खात्याला 1991 मध्ये दिव्य दृष्टीने दिसली का ? असा सवाल उपस्थित होतोय.
सर्वात मोठी गोष्ट म्हणजे 15/10/1991 मध्ये या जागेची खरेदी अब्दुल अजीज डायाभाई यांनी परसमल शहा यांना विकली असताना 21 दिवसांच्या आत उतारावर नवीन मालकाचे नाव नोंदणी करणे आवश्यक असताना तलाठी कार्यालयाने थेट 34 वर्षांनी म्हणजे 17/5/ 2025 रोजी फेरफार नंबर 73107 नुसार परसमल शहा यांचे नाव लावले दिसून येत आहे. (क्रमशः)
वाचत रहा..यात कोण कशा प्रकारे गोलमाल करून भूखंडाचे श्रीखंड खात आहे.