अहिल्यानगर दिनांक 9 जुलै
अहिल्यानगर मध्ये मृत व्यक्ती जिवंत दाखवून जागेची खरेदी विक्री करण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात सुरू असून 1991 च्या सालात या खरेदी दाखवण्याचे प्रमाण जास्त आहे. पूर्वीच्या काळी कोणतीही ऑनलाईन साधने नसल्यामुळे सर्व खरेदी विक्री ही फोटो लावून आणि टायपिंग करून दस्त नोंदवण्याचे काम होते. त्याकाळी तुरळक प्रमाणात संगणक होते इतर काहीअत्याधुनिक साधने होती. त्यामुळे जुने स्टॅम्प पेपर आणि खरेदी तयार करून ते दाखवून मृत माणसे जिवंत दाखवून खरेदी करण्याचा फंडा साध्या जोरात सुरू आहे.
या गँग मधील छोटा चेतन हा महसूल खाते सांभाळतो यांची एक मोठी टीम असून ही टीम सध्या नगरमध्ये विविध राजकीय लोकांना हाताशी धरून खोटे कागदपत्र तयार करून ते खरेदी विक्री करण्याचे काम मोठ्या प्रमाणात करत आहेत. यांच्या टीम मधील काही लोक जागा शोधतात त्यानंतर त्या जागेची माहिती काढून जर जागेचा मालक मृत असेल तर त्याची माहिती काढून त्याच्या नातेवाईकांची माहिती गोळा करतात. त्यांचे नातेवाईक कमजोर असतील तेथून पुढे त्यांच्या लुबाडण्याचे प्लॅनिंग सुरू होते.
नगर मनमाड रोडवरील हड्डी चा कारखाना असलेली जागा ही अशीच बाळजबरी बळावण्याचा प्रकार सुरू असून. यामध्ये खरेदी विक्रीचे अनेक कागदपत्र संशयस्पद असल्याचे दिसून येत आहे. मात्र तरीही साम-दाम-दंड-भेद वापरून ती जागा ताब्यात घेण्याचा प्रकार खुलेआम सुरू आहे.
अशाच प्रकारे निंबळक येथेही अशीच डुप्लिकेट खरेदी करण्याचा प्रकार झाला असून यामध्ये महसूल विभागातील अधिकारी आणि कर्मचारी गुंतलेले आहेत. राजकीय लोकांशी सलगी असल्याचे दाखवून ही गॅंग सध्या शहरातील जागा लुटण्याचे काम करत आहे.
नगर मनमाड रोड वरील जमिनी बाबत या जागेचे
पूर्वाश्रमीचे मालक डायाभाई अब्दुल अजीज यांनी शेख मतीन आलम बशिरूद्दीन यांना १६/०५/२०१६ रोजीच्या हिबानामाच्या दस्ताद्वारे कायमस्वरूपी हस्तांतरित केलेली मिळकत आहे. असा दावा करून वर्तमानपत्रात तशी जाहीर नोटीसही दिलेली आहे आता शेख मतिन आलम बशिरुद्दीन यांनी सह जिल्हा निबंधक, दुय्यम निबंधक कार्यालयात लेखी स्वरूपात तक्रार दिली असून. या जागेची खरेदी विक्री करू नये असे लेखी अर्ज दिलेला आहे.
शेख यांच्या म्हणण्यानुसार १५ ऑक्टोबर १९९१ रोजी खोट्या खरेदीखताच्या आधारे सदर जमीन गुजरातच्या पारसमल मश्रीमल शाह यांच्या नावे नोंदवण्यात आली होती. ते नोंदणी दस्त खोटे आहे असा दावा शेख यांनी केलेला आहे. त्यामुळे आता प्रशासन काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.