HomeUncategorizedगुंडांनी केलेल्या गोळीबारात तीन गोळ्या लागूनही अखेर गुन्हेगारांना जेरबंद करणाऱ्या अहमदनगर जिल्ह्याचे...

गुंडांनी केलेल्या गोळीबारात तीन गोळ्या लागूनही अखेर गुन्हेगारांना जेरबंद करणाऱ्या अहमदनगर जिल्ह्याचे सुपत्र असणारे गजानन पवार यांचा राष्ट्रपती शौर्यपदकाने सन्मान

advertisement

अहमदनगर दि.१८ ऑक्टोबर

महाराष्ट्र पोलीस दलात कर्तव्यवर असणारे आणि सध्या पुणे जिल्ह्यातील लोणीकंद पोलीस स्टेशन येथे पोलीस निरीक्षक म्हणून पदभार सांभाळणारे गजानन पवार (Gajanan Pawar) यांना नुकताच शौर्य पूर्ण कामगिरीसाठी राज्यपालांच्या हस्ते राष्ट्रपती शौर्यपदक(President’s Bravery Medal) देऊन गौरवण्यात आले आहे.

गजानन पवार हे अहमदनगर जिल्ह्याचे सुपुत्र असून पुणे रेल्वे स्थानकातील प्लॅटफॉर्म वर दोन कुख्यात गुन्हेगारांना सापळा लावून अटक करत असताना पोलिसांची चाहूल लागतातच त्या गुन्हेगारांपैकी एकाने स्वतः जवळील रिव्हॉल्व्हर काढून त्याने पोलिसांच्या दिशेने तीन गोळ्या(three bullets) झाडल्या होत्या त्यावेळी गजानन पवार हे या तीन गोळ्या लागून जखमी असतानाही त्यांनी आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने या कुख्यात गुन्हेगारांना जेरबंद(criminals) केले होते.

त्यांनी केलेल्या या शौर्यपूर्वक कामगिरीसाठी त्यांना राष्ट्रपती शौर्यपदक देऊन सन्मानित करण्यात आले आहे. हा सोहळा नुकताच मुंबई येथील राजभवनवर पार पडला राज्यपाल भगतसिंग कोशयारी( Governor Bhagat Singh Koshayari) यांच्या हस्ते आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde)
यांच्या उपस्थितीत शौर्यपदक देण्यात आले.

त्यांना या मिळालेल्या सन्मानाबद्दल अहमदनगर शहरातील प्रसिद्ध विधीज्ञ मंगेश शोले सामाजिक कार्यकर्ते नितीन वाकळे पाटील, भगवान खरमाळे, पवार शेठ यांनी पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular