Homeशहरगणपती विसर्जन मिरवणूक नगर शहर शिवसेनेचे मंडळ मिरवणुकीत सहभागी होणार 14 नंबर...

गणपती विसर्जन मिरवणूक नगर शहर शिवसेनेचे मंडळ मिरवणुकीत सहभागी होणार 14 नंबर गणपती कोणाचा ? या वर्षी शिवसेना प्रमुख उध्दव ठाकरे गट आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गट मिरवणुकीत सहभागी होणार?

advertisement

अहमदनगर दि. ७ सप्टेंबर –

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटा तर्फे दिलीप सातपुते आणि अनिल शिंदे यांच्या वतीने गणपती विसर्जन(Ganapati Immersion ) मिरवणुकीत सहभागी होण्या करीता दोन दिवसांपूर्वी कोतवाली पोलीस ठाण्यात जाऊन परवानगी साठी अर्ज दाखल केला होता आता आज बुधवारी नगर शहर शिवसेना म्हणजेच उध्दव ठाकरे (Uddhav Thackeray)गटाच्या वतीने विसर्जन मिरवणुकीत सहभागी होण्या करीता अर्ज देण्यात आला आहे. मागील वर्षापर्यंत नगर शहर शिवसेना हा एकमेव गणपती गणपती विसर्जन मिरवणुकीत शिवसेनेच्या वतीने सहभागी होत होता मात्र आता यावर्षी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गट आणि शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे गट असे दोन शिवसेनेचे गणपती विसर्जन मिरवणुकीत सहभागी होणार असल्याची चिन्हे दिसत आहेत.

मात्र आता पहिल्यापासून चालत आलेला 14 नंबर कोणाला मिळणार याबाबत दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये चांगलीच उत्सुकता लागून आहे पोलीस प्रशासनासमोरही हा प्रश्न असून हा चेंडू त्यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या कोर्टामध्ये ढकलला आहे त्यामुळे आता जिल्हा पोलीस अधीक्षक यावर काय निर्णय घेणार याबाबत उत्सुकता लागलेली आहे.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular