Homeशहरगणपती विसर्जन मिरवणूक 14 नंबर गणपती कोणाला मिळणार शिवसेना प्रमुख उध्दव ठाकरे...

गणपती विसर्जन मिरवणूक 14 नंबर गणपती कोणाला मिळणार शिवसेना प्रमुख उध्दव ठाकरे गटाला की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाला

advertisement

अहमदनगर दि. 6 सप्टेंबर –

राज्यात सध्या शिवसेनेमध्ये दोन गट झाले असून अनेक ठिकाणी या दोन गटांमुळे प्रशासनासमोर चांगलाच पेच निर्माण होत आहे. राज्यातील राजकारणात मोठी घडामोड होऊन शिवसेनेतून बाहेर पडून एकनाथ शिंदे यांनी भाजप बरोबर युती करत राज्यात शिंदे फडवणीस सरकार स्थापन केले. मुख्यमंत्रीपदी(chifminister) एकनाथ शिंदे यांची वर्णी लागल्यानंतर आपण बाळासाहेब ठाकरे(balasaheb thakarey) यांच्या विचारांच्या शिवसेनेचे शिवसैनिक असून शिवसेना(shivsena) आमचीच अशी भूमिका घेऊन थेट शिवसेनेच्या चिन्हापासून तर शिवसेनेच्या दसरा मेळाव्यापर्यंत शिवसेना कोणाची याबाबत आता न्यायालयीन लढा चालू आहे.

आता अहमदनगर शहरातही पोलीस प्रशासनासमोर नवीन पेच निर्माण झाला असून अहमदनगर शहरातील विसर्जन मिरवणुकीत आजपर्यंत शिवसेनेच्या गणपती मंडळाला 14 नंबरला असायचा हा नंबर शहर शिवसेना या  नावाने दिलीप सातपुते यांच्या अर्जावर या मंडळाला परवानगी मिळत असे.मात्र आता यावर्षी या 14 नंबर साठी   मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाकडून दिलीप सातपुते अनिल शिंदे आणि इतर पदाधिकाऱ्यांनी पत्र देऊन दावा केला आहे.

शिंदे गटाला गणपती विसर्जन मिरवणुकीत 16 नंबर देण्यक्त येत होता. मात्र हा नंबर आम्हाला नको अशी भूमिका शिंदे गटाने घेतली आहे. हा वाद आता थेट जिल्हा पोलीस अधीक्षकांपर्यंत गेला असून तो जे निर्णय घेतील तोच अंतिम राहणार असला तरी याबाबत मुंबईवरूनही काही निर्णय येण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता गणपती विसर्जन मिरवणुकीत 14 नंबर कोणाचा याबाबत चांगलीच रस्सी खेच पाहायला मिळत आहे .

मात्र नगर शाहरतील उद्धव ठाकरे गटाकडून याबाबत कोणतीही भूमिका घेण्यात आली नसून शिवसेनेचा कोणता गट विसर्जन मिरवणुकीत असणार याबाबत आता उत्सुकता लागून आहे.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular