Homeक्राईमत्यांचा होता गणेश विसर्जन मिरवणुकीला गालबोट लावण्याचा डाव...मात्र तोफखाना पोलिसांच्या सतर्कतेने उधळला...

त्यांचा होता गणेश विसर्जन मिरवणुकीला गालबोट लावण्याचा डाव…मात्र तोफखाना पोलिसांच्या सतर्कतेने उधळला तो डाव…

advertisement

अहमदनगर दि.१८ सप्टेंबर
अहमदनगर शहरात गणपती विसर्जन शांततेत पार पडली या विसर्जन मिरवणुकी दरम्यान सावळी उपनगरात मोठा उत्साह दिसून आला शहराप्रमाणे आता सावळी उपनगरातही गणेश विसर्जन मिरवणूक मोठ्या प्रमाणात निघत असल्याने नागरिक मिरवणूक पाहण्यासाठी मोठी गर्दी करत असतात मात्र या शांततेत चाललेल्या मिरवणुकीला गालबोट लावण्याचा काही लोकांचा डाव होता मात्र तोफखाना पोलिसांच्या सतर्कतेमुळे हा डाव उधळला गेला आहे.

तोफखाना पोलीस स्टेशन हद्दीतील उपनगर भागात असलेल्या काही गणेश मंडळांच्या आपसात असलेल्या अंतर्गत कलहामुळे गणेश मंडळांच्या हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवण्यात आलेले असतानाच तोफखाना पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक आनंद कोकरे यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, उपनगराचाराजा गणेश मित्र मंडळाचे गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये असलेल्या गणेश मुर्तीच्या ट्रॅक्टरचे ट्रॉलीमध्ये गुलालाचे गोण्याचे खालील तलवार व काही घातक शस्त्रे काहीतरी घातपात करण्याचे उद्देशाने गणेश मंडळाचे अध्यक्ष व पदाधिकारी यांनी लपवुन ठेवलेली आहे. ही माहिती मिळताच पोलीस निरीक्षक आनंद कोकरे यांनी ताबडतोब धाव घेत तोफखाना पोलीस स्टेशनच्या गुन्हे शाखा शोध पथका कडून संपूर्ण ट्रालीची तपासणी केली असता ट्रॉलीमध्ये एक लोखंडी कोयता, तीन लोखंडी पाईप, एक कटावनी व एक लोखंडी पाईपला सायकलचा गियर लावुन केलेले घातक शस्त्रासह एक बेस बॉल खेळण्याचा दांडा एका सफेद गोणीमध्ये लपवुन ठेवले असल्याचे मिळून आल्याने सदरचे हत्यारे पोलीस स्टाफने जप्त करण्यात आली.

या प्रकरणी पो.हे.कॉ. रणजित अजिनाथ बारगजे यांनी उपनगरचा राजा मित्र मंडळाचे अध्यक्ष व पदाधिकारी यांच्या विरुद्ध दिलेल्या फिर्यादीवरुन तोफखाना ठाण्यात भारतीय हत्यार कायदा कलम 4/25 सह महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 37 (1)(3) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हयाचा पुढील तपास पोहेकॉ दत्तात्रय जपे हे करत आहेत.

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, उप विभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती यांचे मार्गदर्शनाखाली पोनि आनंद कोकरे, सपोनि उज्वलसींह राजपुत, स.पो.नि हेमंत थोरात, नेम.स्था.गु.शा. पोउपनिरी शैलेश पाटील, स.फौ.तनविर शेख, पोहेकॉ दत्तात्रय जपे, सुनिल शिरसाट, दिनेश मोरे, भानुदास खेडकर, अहमद इनामदार, रंजित बारगजे, सुनिल आंधळे, प्रदिप बडे, सुरज वाबळे, पो.हे.कॉ.बेरड, स्था.गु.शा. पो.ना वसीम पठाण, पो.कॉ.सुमीत गवळी, शिरीष तरटे, सतिष त्रिभुवन, दत्तात्रय कोतकर, बाळासाहेब भापसे, सतीष भवर, राहुल म्हस्के, शफी शेख, संदिप गिऱ्हे यांचे पथकाने केली आहे.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular