Homeशहरकचरा संकलनाच्या घोटाळा प्रकरणी ठेका घेतलेल्या स्वयंभू ट्रान्सपोर्ट वर फसवणुकीचा गुन्हा दाखल...

कचरा संकलनाच्या घोटाळा प्रकरणी ठेका घेतलेल्या स्वयंभू ट्रान्सपोर्ट वर फसवणुकीचा गुन्हा दाखल सुमारे एक कोटी रुपयांच्या वर झाली फसवणूक शिवसेना जिल्हा उपप्रमुख गिरीश जाधव यांच्या पाठपुराव्याला यश

advertisement

अहमदनगर दि.१४ जून
अहमदनगर महानगरपालिकेच्या संकलनाच्या कामामध्ये मोठा घोटाळा झाला असून खोटी बिले सादर करून महानगरपालिकेची सुमारे १,४२,६३,१३८ रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी स्वयंभू ट्रान्सपोर्ट यांचे संचालक नामदेव भापकर (रा. ७. फेअर रोड, खडकी, पुणे ) यांच्याविरोधात तोफखाना पोलीस ठाण्यामध्ये भा.द.वि.कलम ४२०,४६७,४६८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख गिरीश जाधव यांनी या प्रकरणी न्यायालयात धाव घेतल्यानंतर न्यायालयाच्या आदेशानुसार मंगळवारी तोफखाना पोलीस ठाण्यात गिरीश जाधव यांच्या फिर्यादी वरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

स्वयंभु ट्रान्सपोर्ट ला महानगरपालिकेचा कचरा संकलनाचा ठेका सन नोव्हेंबर २०१९ ते नोव्हेंबर २०२२ पर्यंत केलेला होते परंतु नोव्हेंबर २०१९ ते फेब्रुवारी २०२०रोजी दरम्यान कॉन्ट्रॅक्टमध्ये देण्यात आलेल्या अटी व शर्तीची स्वयंभु ट्रान्सस्पोर्ट यांनी पुर्तता न करता बनावट पावत्या,बनावट बिले महानगर पालिकेला सादर करून सुमारे १,४२,६३,१३८ /- रुपयांची फसवणूक केली आहे.

नगर शहरात कचरा संकलन करण्यासाठी महापालिकेने 2019 साली ‘स्वयंभू ट्रान्स्पोर्ट’ या संस्थेला ठेका दिला होता. या ठेकेदार संस्थेने अधिकारी आणि पदाधिकाऱयांना हाताशी धरून कचरासंकलनात घोटाळा केला होता. या घोटाळ्याची चौकशी व्हावी आणि संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यासाठी शिवसेनेचे गिरीश जाधव यांनी तत्कालीन भाजप सरकार आणि महापालिकेकडे तक्रार अर्ज दिला होता. मात्र, त्याची दखल न घेतल्याने त्यांनी न्यायालयात धाव घेतली होती.

विशेष म्हणजे सोमवारी न्यायालयाचा आदेश हाती आल्यानंतर आज स्वयंभु ट्रान्सपोर्ट चे मालक संचालक नामदेव भापकर दिवसभर नगर मध्ये ठाण मांडून होते. तसेच त्यांनी महानगरपालिकेच्या अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेतल्याची खात्रीशीर माहिती मिळते. गुन्हा दाखल झालेले स्वयंभू ट्रान्सपोर्ट चे मालक नगर शहरात असताना त्यांना अटक करण्याची कारवाई पोलीस करणार का याबाबत उत्सुकता लागून राहिली आहे.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular