अहमदनगर दि.२१ डिसेंबर
शहारत चोरी छुपे चायना मांजाची विक्री जोरात सुरू असून या वर्षीचा पहिला झटका थेट महापालिकेच्या एका अधिकाऱ्याला आणि एका कर्मचाऱ्याला बसला असून चायना मांजा मुळे महापालिकेचे प्रसिद्धी अधिकारी शशिकांत नजन आणि आणखीन एक कर्मचारी नालेगाव परिसरातून जात असताना चायना मांजा मध्ये आल्याने जखमी झाले आहेत.
महापालिका आयुक्तांनी दोन दिवसांपूर्वी एक बैठक घेऊन चायना मांजा विक्री करणाऱ्यांवर करवाई करावी असे आदेश दिले आहेत. या आदेशाची महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी कठोर अंमलबजावणी करावी अशी अपेक्षा आता नगरकरांकडून असून. या चायना मांज्यामुळे दरवर्षी अनेक लोक जखमी होत असतात. त्यामुळे या चायना मांजावर बंदी असतानाही तो सर्रास विक्री होत आहे.