अहमदनगर दि २ मे
मंगळवारी ३ मे रोजी देशभरात अक्षय्य तृतीया साजरी होणार आहे. अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने किंवा चांदी खरेदी करणे खूप शुभ मानले जाते. त्यामुळेच या दिवशी देशभरात सोन्या-चांदीची प्रचंड विक्री होते. तुम्हीही अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर सोने किंवा चांदी खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर नगर शहरातील चितळे रोड वरील लोढा हाईट्स मधील एस बुऱ्हाडे सराफ तुमच्यासाठी एक उत्तम ऑफर घेऊन आले आहेत. होय, तुमच्या कडे जुने २२ कॅरेट ९१६ सोने असेल तर ते घेऊन या आणि नवीन २२ कॅरेट ९१६ सोने त्याच वजनाचे घेऊन जा कोणतेही घट न कापता एस बुऱ्हाडे सराफ ही सुवर्ण संधी देत आहेत.या ऑफरचा अक्षयतृतीया दिवशीच ग्राहक लाभ घेऊ शकतात.
एवढेच नाही याच बरोबर एस बुऱ्हाडे सराफ दुकानात सोने चांदीच्या दागिन्यांचे विविध अलंकार उपलब्ध असून डिझाईन्सची विस्तृत श्रेणी उपलब्ध आहे. जिथून तुम्ही तुमची आवडती डिझाइन खरेदी करू शकता.सोने आणि चांदीच्या विविध डिझाईन्स आणि योग्य किंमत श्रेणींमध्ये उपलब्ध आहेत.
या ऑफरबाबत एस बुऱ्हाडे सराफ दुकानाचे संचालक संतोष बुऱ्हाडे यांनी या ऑफर बाबत माहिती देताना सांगितले की आमच्या दालनात सर्वोच्च दर्जाचे सोने आणि चांदी उपलब्ध आहे. जुने सोन्याचे दागिने मोडण्यासाठी कुठे गेली तरी त्यामध्ये त्यावेळच्या किमतीनुसार घट कापली जाते त्यामुळे ग्राहकाला त्या नुसार पैसे भेटत असतात मात्र खास अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर आम्ही ग्राहकांसाठी जुने २२ कॅरेट ९१६ सोने त्यांच्या कडे असेल आणि या सुमुहूर्तावर नवीन दागिना करण्याचा विचार असेल तर ते घेऊन या आणि नवीन २२ कॅरेट ९१६ सोने त्याच वजनाचे घेऊन जा कोणतेही घट न कापता अशी ऑफर ग्राहकांच्या फायद्यासाठी ठेवली असल्याचं सांगितलय.
यासोबतच ग्राहकांची सोय लक्षात घेऊन सोन्या-चांदीची नाणी आणि दागिन्यांच्या वेगवेगळ्या डिझाईन्समध्ये आणि वेगवेगळ्या किमतीच्या श्रेणींमध्ये उपलब्ध करून देण्यात आले आहेत. सोन्याच्या प्रत्येक खरेदीसोबत ग्राहकांना शुद्धता मिळेल, असे संतोष बुऱ्हाडे यांनी म्हटले आहे.