अहमदनगर दिनांक २९ डिसेंबर
तोफखाना पोलीस स्टेशनच्या हद्दीत असलेल्या रोड परिसरामधील पारिजात चौक येथे 28 डिसेंबरच्या मध्यरात्री कमलेश कुशवाह याचा खून करण्यात आला होता. कमलेश कुशवाह हा कामगार असून आगाऊ पैसे घेण्याच्या कारणावरून बिंदाप्रसाद कालीदीन रावत त्याच्याशी झालेल्या भांडणातून कमलेश कुशवाह याचा खून झाला होता. याप्रकरणी तोफखाना पोलीस स्टेशनमध्ये कमलेश यांच्या पत्नी मिठाणा कमलेश कुशवह यांच्या विरोधी वरून बिंदाप्रसाद रावत याच्या विरोधात भादवि कलम 302 ,504 प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला होता या गुन्ह्याचा तपास तोफखाना पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जे.सी. मुजावर हे करत होते पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार पोलिसांनी या प्रकरणातील आरोपी असलेल्या बिंदा प्रसाद रावत याला सापळा राहून गुलमोहर रोड परिसरातच अटक केली आहे. आरोपी हा पळून जाण्याच्या प्रयत्नात असतानाच पोलिसांनी अटक केल्याने काही तासातच या गुन्ह्यातील आरोपी पोलिसांनी जेरबंद केला आहे.
या गुन्ह्याचा तपास तोफखाना पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मधुकर साळवे ,सपोनि. जे. सी.मुजावर,पोसई सचिन रनशीवरे, पोहेकॉ. सुनिल शिरसाठ, पोहेकॉ प्रदिप बडे, पोहेकॉ.दत्तात्रय जपे. पोना.संदिप धामने, पोकॉ, शिरीष तरटे, पोकॉ. अतुल कोतकर, पोकॉ. सतिष त्रिभुवन यांचे पथकाने केली आहे.