बारामती दि.१७ एप्रिल
जो कोणी गुणरत्न सदावर्ते याची जिभ हासडेल त्याला मी माझ्या वतीने ११ लाख रुपयांचे बक्षीस देईन. आणि जी कामगार महिला गुणरत्न सदावर्ते च्या हातात बांगड्या भरेल तिला मी ५ लाख रुपयांचं बक्षीस देईन. अशी घोषणा बारामती टेक्स्टाईल पार्क चे कामगार तुकाराम चौधर यांनी बारामती येथे केली.
बारामती एमआयडीसी मध्ये रविवारी विविध कामगार संघटनांनी मुंबई येथे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या निवासस्थानी झालेल्या हल्ल्याचा निषेध करत वकील गुणरत्न सदावर्ते यांना आव्हान दिले.