अहिल्यानगर दिनांक 24 सप्टेंबर
नगर विविध क्षेत्रांतील नेत्यांना, व्यापाऱ्यांना तरुणांना खोट्या प्रेमाच्या जाळ्यात ओढून ब्लॅकमेलिंग करणाऱ्या “हनी ट्रॅप’ची नगरमध्ये लावलेली “ज्योत’ चांगलीच “तेवत’ आहे. मात्र, तिच्या विखारी तेजामुळे अनेकांचे कौटुंबिक वातावरण काळवंडत आहे. 21 वर्षाच्या तरुणा पासून सत्तर वर्षाच्या वयोवृद्धापर्यंत “ज्योती’ने आपले “अनोखे’ “रूप’ दाखवत सध्या धुमाकूळ घातला आहे.

दोन आठवड्यापूर्वी एका लॉजवर नगर तालुक्यातील एका तरुणाला बोलून घेतले. मात्र त्याचा गेम होण्याआधीच त्याने ज्योतीचा डाव उधळून लावला आणि तो स्वतः प्रकाशमय झाला. लॉज मधील रूम मध्ये जाताच तिच्या मोबाईलवर रिंग वाजली आणि आपल्या भावाचा फोन आला आहे त्यांनी आपल्याला लॉज वर येताना पाहिले आहे आता मी काय करू असे त्याने बकऱ्याला सांगताच बकऱ्याच्या लक्षात ही गोष्ट आली आणि त्याने लगेच रूम उघडून धूम ठोकली त्यामुळे तो बकरा होता होता वाचला.
त्याची कहाणी सुरू झाली होती ते एका मिस कॉल पासून. नगर तालुक्यातील त्या तरुणाला एके दिवशी मिस कॉल आला म्हणून त्याने पुन्हा फोन करून नंबर कोणाचा आहे हे तपासला. समोरून मंजुळ आवाजात चुकून कॉल आला असे सांगण्यात आले. त्या मंजुळ आवाजाला तो तरुण भुलला. रात्रभर फोन कडे बघत बसला मात्र फोन आला नाही. दुसऱ्या दिवशी पुन्हा त्याच नंबर वरून मिस कॉल झाला आणि तो तरुण एकदम आनंदित झाला त्यांनी लगेच पुन्हा मिस कॉल आलेला नंबर वर फोन लावून मंजुळ आवाजातील तिच्याशी बोलणे केले तिने नेहमीप्रमाणे कॉल चुकून लागला असे सांगत मंजुळ आवाजात तिने त्या तरुणाला भुलवून टाकले दोन दिवसानंतर व्हाट्सअप मेसेज वर “हाय” असा मेसेज आला आणि त्या तरुणाची व्हाट्सअप कहाणी सुरू झाली.. काही दिवसातच व्हाट्सअप कहानी वरून तो तरुण थेट नगर मध्ये येऊन त्या मंजुळ आवाजातील तिच्याशी भेट घेऊन गेला. त्यानंतर फोना फोनी सुरू झाली आणि काही दिवसांनी लॉजवर गेल्यानंतर आपले प्रेमाचे स्वप्न पूर्ण होईल असे स्वप्न पाहत असतानाच रूम मध्ये जातात मंजुळ आवाजातील तिच्या फोनवर रिंग वाजली तिने फोन उचलून बोलण्याचे नाटक केले फोन ठेवल्यानंतर तिने तरुणाला सांगितले आपल्या दोघांनाही लॉजवर येताना माझ्या भावाच्या मित्रांनी पाहिले आहे आणि आता ते सर्वजण माझ्या भावाला घेऊन या ठिकाणी येणार आहेत. आता आपण काय करायचे. 21 व्या शतकातील तो तरुण असल्याने त्याच्या संगणक मेंदूने लगेच विचार केला असे कसे होऊ शकते आणि त्याला उत्तर मिळाले आता आपण फसलो आहोत. त्यामुळे त्याने एक्झिट चे बटन दाबून फोनवर बोलण्याचा बहाना करून कसेबसे रूमचा दरवाजा उघडून धूम ठोकली. ती थेट नगर तालुक्यातील आपल्या गावाकडे.. त्याला याचेही भान राहिले नाही की त्यांने स्वतःची गाडी त्याच हॉटेलमध्ये विसरलेला होता मात्र काही वेळाने मित्रांना फोन करून त्याने आपली गाडीही मागून घेतली. मात्र मंजूळ आवाजातील ज्योतीचा डाव या ठिकाणी फसला होता तरी तिच्या गँगने तरुणाला गोत्यात आणण्याचा प्रयत्न केला मात्र तो असफल ठरला. तो तरुण नहिले पे दहला ठरला म्हणून तो तरुण वाचला. कारण मंजुळ आवाजातील तरुणीकडे कडे व्हाट्सअप चॅटिंग शिवाय दुसरे काहीच नव्हते. थोड्यावेळ जरी तो रूममध्ये राहिला असता तर व्हिडिओमध्ये तो कैद झाला असता आणि लाखो रुपयांना गंडला गेला असता.
ज्योत से ज्योत जलाये करो म्हणत मंजुळ आवाजातील तिने शहरातील अनेकांना आतापर्यंत लाखो रुपयांना गंडा घातला आहे. विशेष म्हणजे सर्व काही व्हिडिओ रेकॉर्डिंग झाल्यानंतर मध्यस्थी करायला काही पंटरही तिने तयार करून ठेवले आहेत. त्यामुळे त्या धंद्याची “बाजारपेठ’ काबीज करून तिचा धंद्या सध्या अत्यंत तेजित असून झटपट श्रीमंत होऊन ऐषारामात जीवन जगण्यासाठी, कोणत्याही थराला जात समाजविघातक कृत्य करणाऱ्या टोळ्यांच्या उद्योगापायी मात्र व्यापारी उद्योजक बळी पडत आहे.





