अहमदनगर दि.१८ ने
उप प्रादेशिक कार्यलयातील अधिकाऱ्यावर एका महिलेचा माध्यमातून हनीट्रॅप करणाऱ्या टोळीतील फरार असलेला आरोपी सागर खरमाळे याला नगर तालुका पोलिसांनी सापळा लावून अटक केल आहे.
आरोपी खरमाळे याने नगर कल्याण रोड वरील जखणगाव येथील एका महिलेसह त्याच्या इतर साथीदारांच्या मदतीने उपप्रादेशिक कार्यालयातील उच्चपदस्थ अधिकाऱ्याला हनीट्रॅप करून फसवले होते. तसेच त्याच्या कडून अधिकार्याकडे वारंवार दोन कोटी रुपयांची मागणी केली होती. नगर तालुका पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल असून या प्रकरणात इतर आरोपी अटक करण्यात आले होते मात्र सागर खरमाळे हा गुन्हा दाखल झाल्या पासून फरार होता. तो बोल्हेगाव परिसरात येणार असल्याची माहिती नगर तालुका पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप यांना मिळाली होती त्या नुसार नगर तालुका पोलिसांनी सापळा लावून सागर खरमाळेला अटक केली.
नगर तालुका पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप, सफौ. दिनकर घोरपडे, पोहेकॉ. संतोष लगड, पोना. सचिन वणवे, राहुल शिंदे, मपोना. जयश्री फुंदे यांच्या पथकाने ही कारवाई केली.