अहमदनगर दि २ जून
हनुमान चालीसासाठी (Hanuman Chalisa) अग्रह धरणाऱ्यांना ‘तुम्हाला हनुमान चालीसा पाठ आहे का?’ असा खोचक प्रश्न सनाउल्लाह खान यांनी मनसेचे विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष सुमित वर्मा यांना विचारला आहे.
एम आय एम पक्षाचे विद्यार्थी आघाडी शहराध्यक्ष सनाउल्लाह खान यांनी म्हटले आहे की मनसेचे विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष सुमित वर्मा यांनी न बघता हनुमान चालीसा पठण करून दाखवावा. जर त्यांनी न बघता हनुमान चालीसा पठण करून दाखवले तर त्यांचा सत्कार एम आय एम विद्यार्थी आघाडी करेल .
आणि राहिला प्रश्न अहमदनगर च्या नावाचा तर अंबिकानगर हे फक्त उल्लेख करू शकता.मनसे मध्ये जर दम असेल तर त्यांनी अहमदनगरचे नाव अंबिकानगर करून दाखवावे.असे एम आय एम चे विद्यार्थी आघाडी शहराध्यक्ष सनाउल्लाह खान यांनी म्हटले आहे.