अहिल्यानगर दिनांक ५ जुलै
पाथर्डी येथील एका जणास पंधरा लाख रुपयांना हानी ट्रॅप करून पैसे उकळणाऱ्या त्या दोन महिला सध्या फरार आहेत तर ज्याने ही मध्यस्ती केली त्याच्या मागे राजकीय वलय असल्याने तो निश्चिंत आहे मात्र आता त्याच्यासह त्या दोन महिलांवर गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे.कारण पाथर्डीच्या ज्या इसमास लुटण्यात आले आहे तो इसम आता गुन्हा दाखल करण्याच्या मानसिकतेत आहे.
तिसगाव येथील भैया या दोघींचा मोहरक्या तो राजकीय वलय पांघरूण वाघाचे रूप घेऊन या दोघींना बकरे मिळवून देतो आणि त्यानंतर मग त्या दोघी आपल्या पद्धतीने त्या बकऱ्याला कशा पद्धतीने कापायचे याचा प्लॅन करतात आणि याचा शेवट तिसगाव येथील भैय्या मध्यस्थी करून पैसे घेऊन प्रकरण मिटवून देण्याचे नाटक करतो. मात्र खरा मास्टरमाइंड हा तिसगाव चा भैय्या असून अनेक लोकांना आजपर्यंत अशा प्रकारे लुटण्यात आले आहे.
इज्जती पोटी अथवा नाव बदनाम होईल कुटुंबांना गोष्टी कळतील या भीतीपोटी अनेक जण पोलीस स्टेशनची पायरी न चढता बाहेरच हे प्रकरण मिटून घेतात.मात्र पैशाची चटक लागल्यामुळे आता मोठमोठे बकरे मोहच्या जाळ्यात ओढून त्यांना लुटण्याचा जणू सपाटाच सध्या या त्रिकुटाने लावला आहे.