अहिल्यानगर दिनांक 5 ऑगस्ट
मुंबई वरून नगर मध्ये बनावट नावाने हॉटेलची रूम बुक करून ऑनलाईन सट्टा घेणाऱ्या मधुकर सखाराम येवले याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले आहे.

मधुकर सखाराम येवले हा मूळचा मुंबई येथील मुलुंड कॉलनी येथे राहणारा असून त्याने क्रिकेटचा ऑनलाइन सट्टा घेण्यासाठी थेट नगर गाठले होते. नगर मध्ये आल्यानंत त्याने आपले मूळ नाव लपवून
नरसैया मोरप्पा नरसिमा अशा बनावट नावाने हॉटेल रूम बुक केली होती त्यासाठी त्याने बनावट आधारकार्ड स्वतःचे ओळखपत्र म्हणून दिले होते.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांना माहिती मिळाल्यानंतर त्यांनी आपल्या गणेश शाखेचे पथक पोलीस अधीक्षक चौका जवळ असलेल्या हॉटेल सिंग रेसिडेन्सी येथे पाठवून रूम नंबर 201 मध्ये थांबलेल्या मधुकर येवले याच्या रूमची आणि मोबाईलची तपासणी केली. या तपासणीत येवले याने व्हॉट्सअॅपद्वारे ओम (आनंद), पिंटू (अंधेरी), वाजू भाई, संतोष मारू आदी बुकींकडून आयडी आणि पासवर्ड घेऊन पाकिस्तान-वेस्ट इंडीज 20-20 मॅच आणि शेअर मार्केटवर सट्टा खेळत असल्याचे कबूल केले.
येवले याच्याकडून ओप्पो अँड्रॉइड फोन (किंमत 15 हजार रुपये), दोन किपॅड फोन, कॅल्कुलेटर, वही (बुकींची नावे, आयडी, पासवर्डसह) आणि दोन बनावट आधार कार्ड जप्त करण्यात आले.
या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र वाघ करीत असून, बनावट कागदपत्रे आणि सिमकार्ड वापरून फसवणूक केल्याप्रकरणीही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.