अहमदनगर दि.१५ डिसेंबर
आपल्या मेहनतीने व कष्टाच्या बळावर चीपडे बंधूंनी हॉटेल सनी पॅलेस सुरू केले आणि जिद्दीने, कष्ट घेत आज सतरा वर्षांचा यशस्वी टप्पा पार केलाय.
हॉटेल चालवणे ही सोपी गोष्ट नसते हॉटेल चालवताना ग्राहकांच्या जिभेवरची चव ओळखून त्यांना त्यांचे आवडते पदार्थ खाऊ घालणं म्हणजे मोठी परीक्षा असते जर ग्राहकाला चव आवडली नाही तर तो ग्राहक पुन्हा त्या हॉटेलमध्ये येत नाही. मात्र ग्राहकांच्या आवडीनिवडी ओळखून चिपाडे बंधूंनी ग्राहकांना नेहमीच हॉटेल सनी पॅलेस मध्ये आकर्षित केले आहे.
नगर शहराच्या छत्रपती संभाजी नगर रोडवर असलेल्या हॉटेल सनी पॅलेस नगर शहराची शान आहे. शाकाहारी-मांसाहारी असे दोन्ही प्रकारच्या खाद्यपदार्थाने परिपूर्ण रेस्टॉरंट आणि बार असलेल्या हॉटेलचा आज गुरुवारी १७ वा वर्धपान दिन आहे. हॉटेल सनी पॅलेस मध्ये रेस्टॉरंट लॅजिंगची सोया असल्याने बाहेर गावावरून नगर शहरात येणारे पर्यटक, व्यापारी, उद्योगपती, खाजगी कंपन्यांचे अधिकारी, सरकारी-निमसरकारी अधिकारी आदींची राहण्यासाठी प्रथम पसंती ही सनी पॅलेसला असते.
फॅमिली साठी स्वतंत्र व्यवस्था, लहान मुलांना खेळण्यासाठी विविध खेळण्या मोठी लॅन असलेल्या हॉटेल सानी पॅलेस मध्ये चांगल्या दर्जाच्या हॉटेलला लाजवतील अशा सुविधा आणि सेवा उपलब्ध आहेत. हॉटेलचे मालक बाबूशेठ चिपाडे आणि सनी चिपाडे स्वत: ग्राहकांना दिल्या जाणाऱ्या सुविधांवर लक्ष ठेवून असतात.१५ डिसेंबर २००६ रोजी सुरु झालेल्या या हॉटेलला १५ डिसेंबर २०२३ रोजी १७ व्या वर्ष होत असून नुकतेच हॉटेलचे नुतनीकरण व रंगरंगोटी केल्याने आता आणखी आकर्षक रुपात हॉटेल सनी पॅलेस ग्राहकांच्या सेवेत रुजू आहे.
बाबूशेठ चिपाडे आणि सनी चिपाडे यांचे वडील मच्छिंद्र चिपाडे हे सामान्य शेतकरी मात्र मुले मोठे झाल्याने काळानुसार शेतीसह इतर व्यवसायात मुलांनी उतरावे म्हणून नगर औरंगाबाद रोड वर आलेल्या स्वतःच्या मोकळ्या जागेत व्यवसाय उभारण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला आणि हॉटेल व्यवसायात पदार्पण केले आणि गेली १७ वर्ष सचोटीने व्यवसाय करीत ग्राहकांना समाधानकारक सेवा देत हॉटेल सनी पॅलेसचा नावलौकिक वाढवीत असतानाच नगर शहराचा गौरव देखील वाढविला.
हॉटेल सनी पॅलेस मध्ये इंडियन,पंजाबी, साऊथ इंडियन, नॉर्थ इंडियन, तंदुरी, काँन्टीनेंटल, चायनीज,अशा सर्वच प्रकारच्या व्हेज-नॉनव्हेज डिशेसमधील चविष्ट-रुचकर अन्नपदार्थ मिळत असल्याने ग्राहकांना समाधान मिळते. हॉटेलची खासियत म्हणजे लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत संपूर्ण कुटुंब येऊ शकत असल्याने फॅमिली रेस्टॉरंट म्हणूनही या हॉटेलची ओळख निर्माण झाली आहे. येथील अन्नपदार्थ क्वॉलिटी आणि क्वाँटीटीच्या बाबतीत इतर हॉटेलच्या तुलनेत सरस असून ते किफायतशीर दरामध्ये उपलब्ध आहे.
येथील व्यवस्थापन आणि स्टाफ शिस्तबद्धपणे ग्राहकांना सेवा देतो, त्यांच्याकडे आपुलकीने लक्ष पुरवतो. हॉटेल सनी पॅलेस मध्ये नीटनेटकेपणा, टापटीपपणा आणि विशेषतः स्वच्छता काटेकोरपणे राखली जाते. त्यामुळेच येथे येणारे ग्राहक हॉटेलशी कायमचे जोडले जातात. येथे मिळणारी सुविधा आणि सेवा सर्वोत्तम असल्यानेच हॉटेल सनी पॅलेसने नगर शहराच्या जीवनात गौरवाचे स्थान प्राप्त केले आहे.