मुंबई – दि.७ जून
बारावीचा निकाल उद्या बुधवारी लागणार आहे! जून 2022 च्या दुसऱ्या आठवड्यात बारावीचा निकाल लागणार अशी माहिती मागच्याच आठवड्यात शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली होती. त्यानंतर विद्यार्थी आणि पालकवर्ग सगळ्यांचं लक्ष या निकालाकडे लागून होतं. वर्षा गायकवाड यांनी दिलेल्या माहितीनुसार बारावीचा निकाल अगदी वेळेत लागणार आहे. उद्या दुपारी एक वाजता निकाल लागणार.हा निकाल महाराष्ट्र बोर्डाच्या अधिकृत वेबसाईटवर www.mahahsscboard.in बघायला मिळणार आहे. निकाल पाहण्यासाठी स्वतःचा परीक्षेचा सीट नंबर/ रोल नंबर, आईचं नाव माहिती असणं आवश्यक आहे. लवकरात लवकर या वेबसाईटला भेट द्या आणि आपला रिझल्ट चेक करा.
आणि उद्याचा दिवस त्यांच्यासाठी महत्त्वाचे कारण उद्याचा दिवस उद्या बारावीचा रिझल्ट लागणार आहे. बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपलेली आहे आणि निकालाकडे डोळे लावून बसलेल्या विद्यार्थ्यांनी महत्त्वाची बातमी उद्या राज्यात बारावीचा निकाल लागणार आहे दुपारी एक वाजता बारावीचा निकाल लागणार आहे.