Homeक्राईमप्रेमाचा करूण अंत ..प्रेम धोका आणि खून.. पतीची पत्नी आणि सासऱ्याला मारहाण...पाच...

प्रेमाचा करूण अंत ..प्रेम धोका आणि खून.. पतीची पत्नी आणि सासऱ्याला मारहाण…पाच दिवसाच्या जीवन मृत्यूच्या संघर्षात मृत्यू जिंकला

advertisement

अहमदनगर दि.७ ऑक्टोबर :

कौटुंबिक वादातून पत्नी व सासऱ्याला निर्दयीपणे लोखंडी पाईपने मारहाण करून गंभीर जखमी केल्याची घटना 3 ऑक्टोबर रोजी नगर शहरातील तपोवन रोड भागातील भिस्तबाग महाल परिसरात घडली होती.

या मारहाणीत किर्ती महेश भेटे ( २२, रा. ढवणवस्ती, नगर) व विश्वनाथ केशव कसबे ( ५४, रा. ढवणवस्ती) या दोघांना जावाई महेश माणिक भेटे (रा. ढवण वस्ती, नगर) याने मारहाण केली होती कीर्ती आणि विश्वनाथ हे दोघेही गंभीर जखमी झाल्याने त्यांना सुरुवातीला अहमदनगर शहरातील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते त्यानंतर त्यांची परिस्थिती अत्यंत गंभीर झाल्यामुळे पुणे येथे उपचारासाठी नेण्यात आले होते मात्र पाच दिवसाच्या जीवनमृत्यूच्या संघर्षात कीर्ती आणि विश्वनाथ या बाप लेकीचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.

यासंदर्भात रेखा विश्वनाथ कसबे यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती आहे. त्यांची मुलगी कीर्ती
हिचे महेश याच्याशी चार वर्षांपूर्वी लग्न झाले होते. त्यांचा आंतरजातीय विवाह असल्याने महेशच्या आई वडिलांनी
त्यांना घरात घेतले नाही. त्यामुळे हे दोघे भाडोत्री घरात राहत होते. महेश याच्यापासून किर्तीला एक मुलगा झाला. दोन वर्षांपासून महेश हा किर्तीला त्रास देत होता. त्यामुळे सासरे विश्वनाथ कसबे यांनी भरोसा सेलमध्ये तक्रार दिली होती. महेश याचा एक भाऊ पोलीस खात्यात आहे. त्याने भरोसा सेल येथे येऊन तक्रार देऊ नका, मी पोलीस आहे. तुम्हाला बघून घेईन, अशी धमकी दिली होती. किर्ती ही एका खासगी रुग्णालयात काम करत होती. घटस्थापनेच्या एक दिवसआधी महेश याने एका केतकी नावाच्या मुलीसोबत असलेल्या प्रेमसंबंधाच्या कारणावरून किर्तीला मारहाण केली होती. तसेच किर्तीला जीवे मारण्याची धमकी देऊन तो घरातून निघून गेला. तेव्हापासून किर्ती एकटीच राहत होती.

याबाबत तोफखाना पोलीस ठाण्यात तक्रारही
दिलेली होती. त्यानंतर रविवारी (दि. २) रोजी महेश हा घरी आला आहे व तो मोठमोठ्याने दरवाजा वाजत आहे,
अशी माहिती किर्तीने आई रेखा कसबे यांना दिली होती. त्यामुळे रेखा कसबे या तिच्या घरी गेल्या होत्या. परंतु,
महेश भेटे मिळून आला नाही. मुलगी एकटी असल्याने मुलीला घरी घेऊ येतो, तिच्यासाठी फराळाचे बनवं, असे
वडील विश्वनाथ कसबे यांनी पत्नी रेखा यांना फोनवरून सांगितले होते. त्यामुळे रेखा यांनी फराळाचे बनवले व
त्या या दोघांची वाट पाहत होत्या दरम्यान त्यांना किर्ती व पती विश्वनाथ कसबे यांना मारहाण झाली अशी फिर्याद तोफखाना पोलीस ठाण्यात देण्यात आलेली आहे.

विशेष म्हणजे ही घटना घडल्यानंतर घटनास्थळी या प्रकरणातील आरोपीचा भाऊ असलेल्या पोलिसाच्या एक जवळचा वरिष्ठ अधिकारी ज्याची नियुक्ती सध्या केडगाव येथे आहे त्याने तातडीने या ठिकाणी धाव घेतली होती आता या अधिकाऱ्याबरोबर त्या आरोपीच्या पोलीस भावावर कारवाई करावी अशी मागणी कीर्तीच्या नातेवाईकांकडून होत आहे

 

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular

01:34