राहुरी दि।10 ऑक्टोबर :
पोलीस हवालदार भाऊसाहेब आघाव यांच्या आत्महत्या प्रकरणातील आरोपी अद्याप पसार असतानाच आता आघाव कुटुंबीयांना संपविण्याची धमकी देणारे पत्र मुलगा प्रेमकुमार आघाव याच्या नावे आले आहे.
आघाव यांच्या कुटुंबाला शुक्रवार, दि. ७ रोजी मयत भाऊसाहेब आघाव यांचा मुलगा प्रेमकुमार याच्या नावे निनावी पत्राद्वारे धमकी देण्यात आली. याबाबत प्रेमकुमार आघाव याने राहुरी पोलीस ठाण्यात अज्ञात लोकांविरुद्ध फिर्यादीत दिली आहे.फिर्यादीत त्याने म्हटले आहे की, दि. ७ ऑक्टोबर रोजी आघाव यांच्या घरी पोस्टाने दोन निनावी पत्र आले. आलेले पाकीट फोडून वाचले असता, त्यात मयत भाऊसाहेब आघाव यांचा बदनामीकारक मजकूर लिहून सुसेन महाराज नाईकवाडे अहमदनगर नागापूर एम. आय. डी. सी. जिमखाना हॉल १० लाख रुपये जमा करा. भाऊसाहेब याचा व्हिडिओ व्हायरल करण्यात येईल. कुटुंबातील एकही शिल्लक राहणार नाही, असे लिहिले असल्याचे म्हटले आहे
या धमकी पत्रामुळे भाऊसाहेब आघाव आत्महत्या प्रकरण पुन्हा चर्चेत आले आहे. पोलीस हवालदार भाऊसाहेब आघाव यांनी १ ऑक्टोबर रोजी स्वतःच गोळी झाडून आत्महत्या केली होती. त्यांच्या आत्महत्या प्रकरणी राजुर येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे,सहह्याक फौजदार प्रकाश निमसे, मपोकॉ राउत सर्व नेमणुक राजुर पोलीस स्टेशन ता अकोले तसेच शिवाजी फुंदे नेम- पोलीस मुख्यालय यांच्यावर आत्महत्येस प्रवृत्त करण्याबाबत गुन्हा दाखल असून सर्व आरोपी फरार आहेत. त्यांच्या अटकेसाठी आघाव कुटुंबासह गावकरी आक्रमक आहेत. जा आरोपींसह उपविभागीय अधिकारी तसेच पोलीस अधीक्षक कार्यातील कार्यालयीन कर्मचारी यांच्यावर गुन्हे दाखल करावे अशी मागणी आघाव कुटुंबीयांनी केली आहे तर आज रस्ता रोको चा इशाराही आघाव कुटुंबियांनी दिला होता.