Homeशहरविश्व मानवाधिकारचे प्रदेशाध्यक्ष नवेद शेख यांच्याविरुद्धचे खोटे गुन्हे तात्काळ मागे घ्या ...

विश्व मानवाधिकारचे प्रदेशाध्यक्ष नवेद शेख यांच्याविरुद्धचे खोटे गुन्हे तात्काळ मागे घ्या जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन; आंदोलनाचा इशारा

advertisement

अहमदनगर दि.२४ नोव्हेंबर

विश्व मानव अधिकार परिषदेचे प्रदेश अध्यक्ष नवेद शेख यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करण्यात आले असून ते खोटे गुन्हे त्वरित मागे घ्यावेत, अन्यथा आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा जिल्हा पोलिस अधीक्षकांना निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.

नवेद रशीद शेख यांच्यावर कोतवाली पोलिस ठाण्यात खोटी फिर्याद दाखल करण्यात आली आहे. या गुन्ह्यामध्ये चांद सुलतान हायस्कूल या घटनास्थळी नवेद रशीद शेख हे सहभागी नव्हते. त्यांचा घटनेशी कुठल्याही प्रकारचा संबंध नाही. सामाजिक कार्यात त्यांचा सतत सहभाग असतो. त्यामुळे काही गुंड प्रवृत्तीचे लोक अशा खोट्या गुन्ह्यामध्ये नवेद रशीद शेख यांचे नाव गोवण्याचा प्रयत्न करत आहेत. या घटनास्थळी त्या दिवशीचे व्हिडिओ रेकॉर्डिंग आहे. त्यामध्ये नवेद शेख हे कुठेही दिसत नाहीत. त्यामुळे सदरील गुन्ह्याची चौकशी करून खोटा गुन्हा मागे घेण्यात यावा. खोटे गुन्हे दाखल करणाऱ्यावर योग्य ती कारवाई करण्यात यावी. अन्यथा विश्व मानव अधिकार परिषदेतर्फे आंदोलन करण्यात येईल, असे निवेदनात म्हटले आहे.या वेळी जिल्हा अध्यक्ष अल्ताफ शेख सय्यद शफीबाबा, कैफ शेख, अज्जूभाई शेख, शाहनवाज शेख विश्व मानवाधिकार परिषदेचे सर्व पधादिकारी उपस्थित होते

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular