HomeUncategorizedइंग्लंड विरुद्ध पाकिस्तान आणि पोलीस विरुद्ध बुकी मॅच मध्ये इंग्लड तर शहरात...

इंग्लंड विरुद्ध पाकिस्तान आणि पोलीस विरुद्ध बुकी मॅच मध्ये इंग्लड तर शहरात मॅचवर सट्टेबाजी करणारे बुकी ठरले वरचढ दिवसभर शहर पिंजूनही विशेष पथकाच्या हाती काहो लागलेच नाही

advertisement

अहमदनगर दि.१२ नोव्हेंबर
ट्वेन्टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील पाकिस्तान विरुद्ध इंग्लंड दरम्यान झालेल्या सामन्यांवर संकेतस्थळाच्या माध्यमातून मोठी सट्टेबाजी झाली. तसं पाहिले तर सट्टेबाजी आता राज रोस सुरू असून कोणत्याही मॅचवर सट्टेबाजी करणारे पैसे लावत असतात त्यामुळे आता सट्टेबाजी हा प्रकार काही नवीन राहिला नाही. मात्र आज ट्वेंटी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील अंतिम सामना असल्यामुळे या सामन्यावर मोठ्या प्रमाणात सट्टेबाजीच्या माध्यमातून जुगार खेळला जाणार असल्याची माहिती विशेष पोलीस महानिरीक्षकांच्या पथकाला मिळाली होती हे पथक अहमदनगर शहरात दुपारपासूनच सट्टेबाजी करणाऱ्या मोहरक्यांच्या मागावर होते.

नगर शहरातील वाडीयापार्क सरसनगर, आनंदधाम परिसर, नालेगाव, शनी गल्ली चौक, कापड बाजार टांगे गल्ली,स्टेशन रोड परिसर केडगाव रोड अशा ठिकाणी विशेष पोलीस महानिरीक्षकांच्या पथकाने जाऊन शोध घेतला मात्र या पथकाच्या हाती काहीच लागले नाही.

विशेष पथक आज नगरमध्ये असल्याची टीप आधीच मिळाली होती का असच एकंदरीत प्रकार दिसतोय.विशेष पथकाला मिळालेल्या माहितीच्या ठिकाणी काहीच आढळून आले नाही हे विशेष. त्यामुळे आज फायनल मॅच साठी मोठ्या प्रमाणात सट्टेबाजी होऊनही सट्टेबाजी करणारे आज पोलिसांवर वरचढ ठरलेले दिसून आले. कोतवाली हद्दीत बऱ्याच ठिकाणी विशेष पोलीस महानिरीक्षकांच्या पथकाने शोध मोहीम घेतली होती मात्र कुठेच काही हाती न लागल्याने अखेर ही मोहीम मॅच संपल्यानंतर थांबवण्यात आली.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular