अहमदनगर दिनांक १८ नोव्हेंबर
20 नोव्हेंबर रोजी टिपू सुलतान यांची जयंती असून टिपू सुलतान जयंती निमित्त नगर शहरातील मिरवणुकीस परवानगी द्यावी म्हणून सय्यद शहा फैसल बुऱ्हाण यांनी कोतवाली पोलीस स्टेशन मध्ये परवानगी मिळावी म्हणून मागणी केली होती.मात्र कायदा व सुव्यवस्थेच्या कारणावरून कोतवाली पोलिसांनी टिपू सुलतान जयंती निमित्त निघणाऱ्या मिरवणुकीस परवानगी नाकारली होती. याच्या विरोधात दाद मागण्यासाठी सय्यद शहा फैसल बुऱ्हाण यांनी औरंगाबाद हायकोर्टामध्ये धाव घेतली. शुक्रवारी दुपारी औरंगाबाद हायकोर्टामध्ये याबाबत सुनावणी होणार होती मात्र आद्यपही त्या औरंगाबाद हायकोर्टात सूनवणी झाली नसल्याची माहिती मिळतेय.
टिपू सुलतान जयंती निमित्त नगर शहरातून याआधी एकदा मिरवणूक निघाली होती मात्र त्यानंतर पुन्हा कधीही मिरवणूक काढण्यात आली नव्हती मात्र यावर्षी ही मिरवणूक निघावी म्हणून पोलिसांकडे रीतसर परवानगी मागण्यात आली होती. ही मिरवणूक इम्पेरियल चौकापासून निघून कोठला मैदाना पर्यंत शहराच्या मुख्य मार्गावरून जाणार होती मात्र गेल्या काही वर्षांमध्ये निघालेल्या मिरवणुकीत झालेले वाद पाहता पोलिसांनी कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी या मिरवणुकीला परवानगी दिलेली नाही अशी माहिती कोतवाली पोलिसांनी दिलीय.