Homeशहरअहमदनगर शहरातील उड्डाणपुलाचे लोकार्पण केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थित संपन्न राष्ट्रवादी काँग्रेसचे...

अहमदनगर शहरातील उड्डाणपुलाचे लोकार्पण केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थित संपन्न राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांचे नितीन गडकरी यांच्या कडून विशेष अभिनंदन

advertisement

अहमदनगर दि.१९ नोव्हेंबर

अहमदनगर शाहरतील उड्डाणपुलाचे लोकार्पण आज नगर शहरातील शिल्पा गार्डन येथे देशाचे रस्ते व बांधकाम मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते झाला .331.17 करोड रुपयांचा खर्च या उड्डाणपूलच्या कामास आला असून अहमदनगर पुणे रोड वरील सक्कर चौका पासून सुरू होणार असून औरंगाबाद रोड वरील अशोका हॉटेल पर्यंत 3.8 किलो मीटरचा हा पूल चार पदरी आहे.एकूण 85 खांबावर हा पूल उभारला गेला असून 18 डिसेंबर 2020 रोजा पुलाच्या कामास सुरुवात झाली होती.दोन वर्षांच्या आत या पुलाचे काम पूर्ण झाले असून या पुलामुळे स्थानिक वाहतूक अबी राष्ट्रीय महामार्गाची वाहतूक विभागली जाणार आहे.

या वेळी भाषण करताना सुरवातीलाच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी माजी खा. दिलीप गांधी यांच्या योगदानादसह खा.सुजय विखे आणि राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांच्या संकल्पनेतून उड्डाणपुलाच्या पिलरवर छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास रेखाटला जात असून त्यासाठी खासदार विखे आणि आमदार संग्राम जगताप यांनी आपल्या निधीतून या कामास निधी उपलब्द केला असल्याने या दोघांचे विशेष आभार मी मानतो हा पूल सुंदर करण्याचा प्रयत्न दोघांनी केला आणि त्यामुळे राज्यात याचे अनुकरण नक्की केले जाईल असे मंत्री नितीन गडकरी म्हणटले.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील,खा.सदाशिव लोखंडे,खा.सुजय विखे पाटील,आमदार बबनराव पाचपुते,आमदार मोनिका राजळे,आमदार राम शिंदे,आमदार संग्राम जगताप,माजी आमदार शिवाजी कर्डीले, माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे,महापौर रोहिणी शेंडगे,भैय्या गंधे,सुवेंद्र गांधी,यांच्या उपस्थितीत पार पडला

advertisement

Previous article
Next article

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular