Homeशहरमॉडेल कॉलनी कराचीवाला नगर येथे ओपन स्पेस कामाचा शुभारंभ शहरातील डीपी...

मॉडेल कॉलनी कराचीवाला नगर येथे ओपन स्पेस कामाचा शुभारंभ शहरातील डीपी रस्ते नकाशावर होते ते अस्तित्वात आणण्याचे काम सुरू : आमदार संग्राम जगताप

advertisement

अहमदनगर दि.१५ नोव्हेंबर :
राज्य सरकार बदलले असल्यामुळे शहर विकासासाठी मंजूर करून ठेवलेल्या विकास कामांना स्थगिती देण्यात आले आहे लवकरच मंत्री महोदयांना भेटून स्थगिती उठवण्याचे काम केले जाणार आहेत प्रत्येक कॉलनी मध्ये मनपाच्या मालकीचे ओपन स्पेस असतात त्याचे सुशोभीकरण होणे गरजेचे आहे या माध्यमातून नागरिकांना त्या जागेचा उपयोग घेता येईल शहरांमध्ये काही डीपी रस्ते फक्त नकाशावरच आहे आता ते रस्ते अस्तित्वात आणण्याचे काम सुरू आहे उदाहरणार्थ रामवाडी ते तारकपूर रोड या रस्त्याचे काम पूर्ण केल्यामुळे या भागाला महत्त्व प्राप्त झाले आहे या रस्त्यामुळे व्यावसायिकरणाचे रूप प्राप्त झाले आहे मॉडेल कॉलनी कराची वाला नगर येथे सुशोभीकरणाचे काम सुरू केले आहे त्यामुळे या परिसराला शोभ प्राप्त होणार आहे विकास कामासाठी दिलेला निधी जनतेच्या उपयोगात यावा  या दृष्टीने कामे सुरू आहेत असे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले.
        मॉडेल कॉलनी कराचीवाला नगर येथे आमदार संग्राम जगताप यांच्या स्थानिक विकास निधीतून ओपन स्पेस सुशोभीकरण कामाचा शुभारंभ संपन्न झाला यावेळी रजत दायमा,प्रकाश पोखरणा,पेमराज पोखरना,ॲड प्रसन्न जोशी, राजेंद्र सुद्रिक,भुषण बिहानी,विकी मुथा,प्रकाश खंडेलवाल,कल्पेश इंदानी,विकी बोरा,शेखर डोंगरे,हर्षल जोशी,अशोक डागा,अक्षय बोरा,राहुल झंवर,राजेश बजाज,परेश बजाज,महेश बिहानी,सीए आनंद इंदानी,वेदांत बजाज,तन्मय इंदानी,जोयेब शेख आधी उपस्थित होते.
रजत दायमा म्हणाले की आमदार संग्राम जगताप यांच्याकडे ओपन स्पेस सुशोभीकरण करण्याची मागणी केल्यानंतर त्यांनी तातडीने निधी उपलब्ध करून दिला आहे त्यामुळे या परिसरातील नागरिकांची जॉगिंग साठी सोय झाले आहे त्याचबरोबर ज्येष्ठ नागरिकांना बसण्यासाठी हक्काची जागा मिळाली या ओपन स्पेस मध्ये मोठ्या प्रमाणात वृक्षरोपण करून त्याचे संवर्धन केले जाईल याचबरोबर मॉडेल कॉलनी कराचीवाला नगर परिसरातील रस्त्यांचे कामेही आमदार संग्राम जगताप यांच्या माध्यमातून लवकरच मार्गी लागतील असे ते म्हणाले.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular