HomeशहरIncome Tax Raid : ACS कन्स्ट्रकशन कार्यालयावर आयकर विभागाचा छापा

Income Tax Raid : ACS कन्स्ट्रकशन कार्यालयावर आयकर विभागाचा छापा

advertisement

अहिल्यानगर दिनांक 12 ऑगस्ट
अहिल्यानगर शहरातील उद्योजक अफजल शेख यांच्या कार्यालयावर मंगळवारी सकाळी आयकर विभागाने छापा मारला. नाशिक येथील आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी हा छापा मारल्याच्या माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

Oplus_131072

सकाळी आठ वाजेच्या दरम्यान अफजल शेख यांचे माळीवाडा बस स्थानक शेजारील ACS कन्स्ट्रकशन या नावाने कार्यालय आहे त्या ठिकाणी आयकर विभागाचे पथक पोहोचले.या छापेमारीमुळे नगर शहरात मोठी खळबळ उडाली आहे.

अफजल शेख बांधकाम व्यावसायिक देखील आहेत. मंगळवारी सकाळी 8 वाजता आयकर विभागाचे 10 ते 12 अधिकारी चार वाहनांच्या ताफ्यासह माळीवाडा परिसरात दाखल झाले होते त्यामुळे सुरवातीला हा आयकर विभागाचा छापा आहे हे कोणाला कळले नव्हते त्यामुळे या परिसरात उलट सुलट चर्चेला आहे होते.

सकाळ पासून आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी शेख यांच्या कार्यालयावर तळ ठोकला असून कागदपत्रांची तपासणी सुरू आहे.तसेच येणाऱ्या जाणाऱ्यांची कसुन तपासणी केली जात आहे.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular