अहिल्यानगर 9 मी
सध्या भारत आणि पाकिस्तान मध्ये युद्धजन्य परिस्थिती असून त्या अनुषंगाने महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक तसेच नाशिक परिक्षेत्राचे विशेष महानिरीक्षक अहिल्यानगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आणि अहिल्यानगर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या सूचनेनुसार जिल्ह्यातील नागरिकांसाठी सूचना आणि आवाहन करण्यात आले असून नागरिकांनी प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे असे आवाहन पोलीस प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
१. **अफवांवर विश्वास ठेवू नका:*
२. *फक्त सरकारी अधिकृत स्रोतांकडून (जसे की आकाशवाणी, दूरदर्शन, सरकारी वेबसाइट्स किंवा अधिकृत सोशल मीडिया हँडल्स) मिळणाऱ्या माहितीवर विश्वास ठेवा.*
३. *कोणत्याही धार्मिक, जातीय भावना दुखावतील अशा टिप्पणी करू नका*
४. *सोशल मीडिया,* *व्हॉट्सऍप, किंवा अज्ञात स्रोतांवर येणाऱ्या संदेशांना प्रतिसाद देऊ नका.*
५. *जर तुम्हाला संशयास्पद व्यक्ती किंवा वस्तू दिसली, तर त्वरित पोलिस किंवा प्रशासनाला कळवा. Dial 112 ची योग्य मदत घ्या.*
६. *माहितीची पडताळणी:** *कोणतीही बातमी सामायिक करण्यापूर्वी ती “फॅक्ट-चेक” करा. खोटी माहिती पसरवणे गुन्हा आहे.*
७. *कोणत्याही प्रकारची अनोळखी apk file, link ओपन करू नये. त्यामागे विघातक कृत्य/*सायबर अटॅक* *असू शकते अथवा शत्रू राष्ट्र आपली महिती चोरी करू शकते.*
८. *शासनाने निर्गमित केलेल्या सूचनांचे पालन करा.*
९. *ब्लॅकआऊट म्हणजे काय आणि अशावेळी काय करावे, यांचे व्हिडिओ विद्यार्थी, नागरिकांपर्यंत अधिकारी आणि पोलीस अंमलदार पोहोचवतील त्यावेळी जास्तीत -जास्त लोकांनी यामध्ये माहिती घ्यावी आणि प्रशासनास सहकार्य करावे.*
10. *अहिल्यानगर पोलिसांचा सायबर सेल समाजमाध्यमांवर देखरेख ठेवत असून पाकिस्तानला मदत करणारे हॅण्डल ओळखून त्यावर कारवाई करत असून शत्रूला मदत करणारी अथवा चुकीची माहिती कुणी प्रसारित करीत असेल तर त्यावर गुन्हे नोंद करण्यात येतील.*
11. *सर्व सोसायटी मधील सर्व सदस्य /नागरिकांनी बैठक घेउन त्यांनाही ‘ब्लॅकआऊट’ बाबत जागरूकता निर्माण करावी.*
12. *सैन्याच्या तयारी संबधित गतिविधीचे चित्रिकरण करणे आणि ते समाजमाध्यमांवर प्रसारित करणे या गुन्हा असून देशाची युद्ध तयारी ची माहिती यामुळे दुश्मन राष्ट्राला होऊ शकते यामुळे असे चित्रीकरण कोणी करू नये.*
*सर्व नागरिकांना अहिल्यानगर पोलीस विभाग वरील प्रमाणे निर्देशचे पालन करणाचे आवाहन करीत असून शांतता आणि विवेक राखून देशाच्या सुरक्षा अंखाडीत राखणेकरिता सहकार्य करा.*
*आपला नम्र*
*प्रताप दराडे*
*पोलीस निरीक्षक*
*कोतवाली पोलीस स्टेशन* *अहिल्यानगर*
*मो नं* :- *7385553120*
*पो स्टे नं* :- *02412416117*
*पो नियंत्रण कक्ष नं* :- *02412416100*