HomeUncategorizedव्यायाम करताना थकवा येऊ नये म्हणून "टर्मिनची" मात्रा या इंजेक्शनची तरुणांकडून चांगलीच...

व्यायाम करताना थकवा येऊ नये म्हणून “टर्मिनची” मात्रा या इंजेक्शनची तरुणांकडून चांगलीच मागणी

advertisement

अहमदनगर दि.२८ जुलै

आजकालचे तरुण आपल्या शरीराकडे जास्त लक्ष देत आहेत. चित्रपटाचा प्रभाव म्हणा अथवा जिम संस्कृतीचा प्रभाव यामुळे अनेक तरुण जिम मध्ये तासनतास वर्कआउट करण्यात घालत असतात. ही गोष्ट खूप चांगली आहे मात्र आता या चांगल्या गोष्टी मागे काही भयानक गोष्टी सुरू असल्याचं काही घटनांवरून समोर येत आहे. अनेक तरुण व्यायाम करताना थकवा येऊ नये म्हणून आणि जास्तीत जास्त व्यायाम करता यावा म्हणून विविध इंजेक्शनचे डोस घेत असल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे.

शरीरातील स्नायू वाढवण्यासाठी विविध गोळ्या इंजेक्शनचा मारा तरुण आपल्या शरीरावर करत असतात काही काळ त्याचा प्रभाव चांगला होतो मात्र कालांतराने त्याचे दुष्परिणाम समोर येतात.

Termin टर्मिन नावाचे इंजेक्शन आजकाल अनेक मेडिकल स्टोअर्स मधून चोरीछुपे विकले जात आहे. याची माहिती मिळतीय.या इंजेक्शनची तरुणांमध्ये मोठी क्रेझ निर्माण झाली आहे. व्यायाम करताना थकवा येऊ नये म्हणून हे इंजेक्शन तरुण आपल्या शरीरात टोचवून घेतात आणि तासंतास व्यायाम करत राहतात. मात्र या इंजेक्शनचा काही ठराविक डोसच घेतला तर तो शरीराला हानिकारक नसतो मात्र या इंजेक्शनची मात्रा जास्त झाली तर नंतर याचा व्यसन लागतं आणि इंजेक्शन भेटले नाही तर तो माणूस इंजेक्शन वाचून तडफडत राहतो ही वस्तुस्थिती आहे.

Termin Injection चा वापर हायपोटेन्सिव्ह (कमी रक्तदाब) स्थितींमध्ये रक्तदाब वाढवण्यासाठी केला जातो, जसे की स्पाइनल ऍनेस्थेसिया. हे हृदयाची पंपिंग क्षमता वाढवून आणि हृदयाच्या रक्तवाहिन्या अरुंद करून रक्तदाब वेगाने वाढवते.यासाठी केला जातो अशी माहिती डॉ. ललित कनोडिया एमडी (फार्माकोलॉजी), एमबीबीएस यांनी आणि डॉ. बेटीना चंडोलिया एमडीएस, बीडीएस यांनी सांगितले आहे.ही इंजेक्शन बनवणाऱ्या कंपनीने कधीही सांगितले नाही की इंजेक्शन घेतल्याने थकवा येत नाही किंवा तासनतास व्यायाम करूनही माणूस थकत नाही मात्र काही लोकांच्या सांगण्यात वरून तरुण हे इंजेक्शन घेत राहतात आणि नंतर आहारी जातात.

इंजेक्शनच्या वापरा बाबतचा स्रोत गुगल

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular