शनिवारी रात्री साडे दहा वाजता ही कारवाई करण्यात आली. लाटणेकडून 10 हजार रूपये किमतीचा एक मोबाईल जप्त करण्यात आला आहे. सध्या आयपीएल क्रिकेट मॅचवर मोठ्या प्रमाणात सट्टा बाजार सुरू आहे. यातून कोट्यवधी रुपयांची दररोज उलाढाल होत आहे. येथील अमरधामसमोरील किरण मोबाईल शॉपीसमोर बसून एक व्यक्ती आयपीएल क्रिकेट मॅचवर सट्टा घेत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांना मिळाली होती.
उपनिरीक्षक मनोज कचरे, अंमलदार तनवीर शेख, योगेश भिंगारदिवे, ए. पी. इनामदार, संदीप थोरात, कैलास शिरसाठ, सागर मिसाळ, सोमनाथ राऊत, सुजय हिवाळे यांना कारवाई करण्याचे आदेश दिले. पोलिसांनी दोन पंचासमक्ष नमूद ठिकाणी छापा टाकून कारवाई केली आहे.