HomeUncategorizedकोट्यवधी रुपयांचे हस्तिदंत हस्तगत अहमदनगरच्या स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई सहा आरोपींच्या मुसक्या...

कोट्यवधी रुपयांचे हस्तिदंत हस्तगत अहमदनगरच्या स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई सहा आरोपींच्या मुसक्या आवळल्या

advertisement

अहमदनगर दि.२ जुलै

अहमदनगर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने कोट्यवधी रुपयांचे बाजारमूल्य असलेले हस्तीदंत अर्थात हत्तीचे दात जप्त केले. या प्रकरणात सहा तस्करांना अटक करण्यात आली.

औरंगाबाद महामार्गावर जेऊर टोलनाका येथे हस्तीदंतांची तस्करी होणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीआधारे पोलिसांनी टोलनाका परिसरात सापळा रचला. सापळा रचून पोलिसांनी व्यंकटेश दुरईस्वामी, वय ४०, हल्ली रा. वाकोडी फाटा, दरेवाडी, ता. जि. अहमदनगर , महेश बाळासाहेब काटे, वय ३०, रा. आखेगांव, ता. शेवगांव,महेश भगवान मरकड, वय २६, रा. गहिलेवस्ती, ता. शेवगांव, सचिन रमेश पन्हाळे, वय ३३, रा. आखेगांव, ता. शेवगांव,निशांत उमेश पन्हाळे, वय २५, रा.भगतसिंग चौक, शेवगांव,संकेश परशुराम नजन वय २३, रा. पवारवस्ती शेवगांव या सहा आरोपींना अटक केली.

बहुमुल्य शोभेच्या वस्तु व औषधे या करीता हस्तीदंत तस्करी करणारी टोळी हस्तीदंत व चारचाकी वाहनासह जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे. सादर कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके, सपोनि/गणेश इंगळे, पोसई/ सोपान गोरे, सफौ / राजेंद्र वाघ, पोहेकॉ/बापुसाहेब फोलाणे, देवेंद्र शेलार, पोना/भिमराज खसे, सुरेश माळी,शंकर चौधरी, रवि सोनटक्के, पोकों/सागर ससाणे व मच्छिद्र बर्डे यांच्या पथकाने केली.

 

या गुन्ह्याची सविस्तर हकीकत अशी की सस्थानीक गुन्हे शाखेचे एक पथक नगर औरंगाबाद रोडवरील, जेऊर टोलनाका येथे वेशांतर करुन सापळा लावुन थांबले होते या ठिकाणी दोन संशयीत इसम टोलनाका परिसरात पाठीवर मिल्ट्री रंगाची सॅक संशयीतरित्या फिरत होते.काही वेळाने संशयीत इसमा जवळ एक ग्रे रंगाची आय २० कार येवून थांबली व कार मधुन चार इसम खाली उतरले. संशयीत दोन इसम कारमधुन आलेल्या इसमांना सॅक मधुन एक मोठा हस्तीदंत सारखी वस्तु दाखवुन बोलत असतांना हस्तीदंत विक्री करण्यासाठी आलेले इसम हेच आहेत अशी पोलीस पथकाची खात्री झाल्याने त्यांनी संशयीत इसमांना झडप घालुन शिताफीने ताब्यात घेतले.आणि त्यांच्या ताब्यात हस्तीदंत सारखी वस्तु मिळुन आल्या नंतर संशयीत इसमांना त्या बाबत विचारपुस करता त्यांनी हस्तीदंत खरे असुन ते विक्री करण्यासाठी आलो अशी कबुली दिली.

बहुमूल्य शोभेच्या वस्तु व औषधे आदी करीता हस्तीदंताचा वापर होत असल्याने हत्तीचे दातांना आंतराष्ट्रीय बाजारात विशेष महत्व आहे. मात्र दातांची किंमत जाहिर केल्यास हत्तीचे दातांच्या तस्करीसाठी हत्तीची हत्या करण्याचे प्रमाण वाढु शकते. त्यामुळे वन विभागाने या दातांची किंमत जाहिर करण्यास बंदी घातलेली आहे. सदर घटने बाबत एमआयडीसी पोलीस स्टेशन येथ भादविक ४२९ सह वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ चे कलम २ (१६), ९, ३९, ४४, ४९ (ब), ५० व ५१ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular