मुंबई दि.८ जुलै
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांना पाठिंबा देणाऱ्या आमदारांची संख्या वाढताना दिसत आहे. विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बोलावलेल्या बैठकीला उपस्थित राहिलेल्या आमदारांमधील काही दिग्गज आमदारांनी अजित पवार यांची भेट घेतल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे यामध्ये महाराष्ट्राचे माजी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांचादेखील समावेश आहे.
राष्ट्रवादीच्या फुटी नंतर अहमदनगर जिल्ह्यातील सहा आमदारांपैकी रोहित पवार प्राजक तनपुरे या अध्यापही शरद पवारांच्या साथीला आहेत तर अहमदनगर शहराचे आमदार संग्राम जगताप पारनेरचे निलेश लंके आणि किरण लाहमटे हे अजित पवार यांच्याबरोबर गेले आहेत तर कोपरगाव चे आमदार आशुतोष काळे यांनी आपली भूमिका गुलदस्त्यात ठेवली आहे.
अहमदनगर जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे ज्येष्ठ विधान परिषदेचे माजी आमदार अरुण काका जगताप यांनीही आज मुंबई येथे जाऊन उपमुख्यमंत्री अजित पवार यांची सदिच्छा भेट घेतली आणि उपमुख्यमंत्री झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले यावेळी राष्ट्रवादीचे नूतन प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचेही माजी आमदार अरुण काका जगताप यांनी अभिनंदन केले तसेच नगर शहर विकासाच्या दृष्टीने यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबरोबर चर्चा झाली असून अहमदनगर शहराला पुन्हा एकदा भरघोस निधी भेटेल असा विश्वास माजी आमदार अरुण काका जगताप यांनी व्यक्त केलाय.
राष्ट्रवादीची लढाई आता निवडणूक आयोगात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात उभी फूट पडली आहे. एका बाजूला शरद पवार तर दुसऱ्या बाजूला अजित पवार आहेत. सध्या तरी अजित पवार यांचं पारडं जड दिसत आहे. पण तरीही राजकारणात काय होईल, याचा भरोसा नाही.