अहिल्यानगर दिनांक ८ डिसेंबर
अहिल्यानगर येथील केशर गुलाब मंगल कार्यालयात ९ डिसेंबर रोजी सकाळी ९ वाजता जैन संप्रदायाच्या चारही पंथांच्या गुरू भगवंतांचे हिंदी मध्ये जाहीर प्रवचन होणार आहे. यावेळी आचार्य भगवंत श्री महाबोधी सूरिश्वरजी महाराजा साहेब आदि ठाणा २, दिगंबरी समाजाचे आचार्य भगवंत श्री क्रांतिकारी राष्ट्रसंत गुप्तीनंदजी महाराजा साहेब आदि ठाणा ३, महाराष्ट्र प्रवर्तक कुंदनऋषीजी महाराजा साहेब आदि ठाणा ३ तसेच १३ पंथाचे आलोकमुनीजीजी महाराजा साहेब आदि ठाणा २ आणि साध्वीजी भगवंत यावेळी उपस्थित राहणार आहेत.

या प्रवचनास उपस्थित राहून या अमृतवाणीचा लाभ घ्यावा असे आवाहन जैन मंदिराचे अध्यक्ष सुभाष मुथा व दिगंबर जैन समाजांचे महावीर बडजाते, धार्मिक परीक्षा बोर्डचे सेक्रेटरी संतोष बोथरा, श्री संघाचे संतोष गांधी आदींनी केले आहे.





