अहिल्यानगर दिनांक १२ जानेवारी
मराठा सेवा संघ प्रणित जिजाऊ ब्रिगेडच्या अहील्यानगर जिल्हाध्यक्षपदी ॲड. स्वाती जाधव यांची नियुक्ती करण्यात आली असून आज सिंदखेड येथे जिजाऊ जन्मोउत्सव सोहळा आयोजित करण्यात आला होता या ठिकाणी झालेल्या भव्य दिव्य अशा कार्यक्रमात ॲड. स्वाती जाधव यांना जिजाऊ ब्रिगेडच्या प्रदेश अध्यक्षा शिवमती सीमा बोके यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले आहे यावेळी जिजाऊ ब्रिगेडच्या आंतरराष्ट्रीय कार्याध्यक्ष सुजाताई ठुबे, शिवमती प्रदेश अध्यक्ष सीमाताई बोके, प्रदेश महासचिव श्रीमती स्नेहा ताई खेडेकर, प्रदेश कार्याध्यक्ष शीवमती राजश्रीताई शितोळे, प्रदेश प्रवक्ता रेखाताई सूर्यवंशी, प्रदेश उपाध्यक्ष वर्षाताई माने, प्रदेश संघटक ताई बोराडे, प्रदेश कार्याध्यक्ष विभावरी ताकट,डॉक्टर कल्पनाताई ठुबे,प्रदेश ज्येष्ठ मार्गदर्शिका नंदाताई शिंदे उपस्थित होत्या.
ॲड. स्वाती जाधव या नगर शहरातील सृष्टी कॉम्प्युटर व माऊली अभ्यासिकेच्या संचालिका असून जिजाऊ ब्रिगेडच्या सक्रिय सभासद म्हणून अनेक वर्षापासून काम करत आहेत .सृष्टी टायपिंग मध्ये गरजवंत विद्यार्थ्यांना मोफत टायपिंग शिकवली जाते. दरवर्षी चार ते पाच विद्यार्थ्यांना दत्तक घेऊन त्यांचा वर्षभराचा शिक्षणासाठीचा खर्च करण्याचा उपक्रमही गेला अनेक वर्षांपासून स्वाती जाधव या करत आहेत. या सर्व कार्याची दखल घेऊन नगर शहर अध्यक्ष म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली.
जिजाऊ ब्रिगेड संघटन, निवडी, बांधणी आणि
विस्ताराचे काम मी करणार आहे. तळगळापर्यंत जिजाऊ ब्रिगेड वाढवण्याचे काम करणार असल्याचे नूतन अध्यक्षाॲड. स्वाती जाधव यांनी सांगितले.
मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, जिजाऊ ब्रिगेडच्या
पदाधिकाऱ्यांनी निवडीबद्दल त्यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.