अहिल्यानगर दिनांक ५ डिसेंबर
अहिल्यानगर महानगर पालिकेची निवडणूक काही दिवसात होणार असून त्यामुळे अनेक इच्छुक उमेदवारांनी काम सुरू केले आहे.सर्वच राजकीय पक्षात अनेकजण इच्छुक असून कोणाच्या गळ्यात पक्षाच्या उमेदवारीची माळ पडते हे कळायला उशीर असला तरी सध्या अनेक इच्छुक उमेदवार आपापल्या प्रभागात कामाला लागलेले दिसून येत आहेत.

अहिल्यानगरच्या जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हाअध्यक्षा ॲड.स्वाती जाधव यांच्या सोशल मीडियावर आलेल्या पोस्टमुळे त्या महापालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याच्या चर्चेला वेग आला आहे.
सामाजिक कार्यकर्त्या आणि पेशाने वकील असणाऱ्या अहिल्यानगर जिल्ह्याच्या जिजाऊ ब्रिगेडच्या माध्यमातून विविध क्षेत्रात आपल्या कामाचा ठसा उमटवणाऱ्या ॲड.स्वाती जाधव यांच्या व्हायरल पोस्टमुळे आगामी महानगर पालिका निवडणुकी मध्ये त्या उतरणार असल्याचं दिसून येत आहे.
मात्र प्रभाग क्रमांक सहा मधून निवडणुकीच्या रिंगणात उतरताना त्या कोणत्या पक्षाकडून उमेदवारी करणार या बाबत सोशल मीडियावर असणाऱ्या पोस्ट वर कोणत्याही पक्षाचा उल्लेख नसल्याने सस्पेन्स वाढला आहे.महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जाधवयांच्यापुढे राष्ट्रवादी काँग्रेस,भाजप किंवा शिवसेना अशा विविध पक्षांचा पर्याय आहे.जाधव यांच्या पोस्टमध्ये महापालिका निवडणुकी विषयी मजकूर दिसत असल्याने त्या निवडणूक लढवणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.
1) ॲड स्वाती जाधव नेमक्या कोण आहेत?
→ सामाजिक कार्यकर्त्या, जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्ष म्हणून कार्यरत..
3) स्वाती जाधव यांच्यापुढे कोणत्या पक्षात जाण्याचा पर्याय आहे?
→ राष्ट्रवादी ,भाजप किंवा शिवसेना यांच्या शिवसेनेत जाण्याचा पर्याय आहे.
4) त्या निवडणूक लढवणार आहेत का?
→ व्हायरल पोस्टमधील महापालिकेच्या निवडणुकीच्या मजकुराच्या पार्श्वभूमीमुळे निवडणूक लढवण्याचे संकेत दिसत आहेत.





