Homeराजकारणयावर्षी जनतेनेच ठरवले आहे.. अभिषेक ला आमदारकीचा अभिषेक घालणार.. उमेदवारी अर्ज दाखल...

यावर्षी जनतेनेच ठरवले आहे.. अभिषेक ला आमदारकीचा अभिषेक घालणार.. उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर खासदार निलेश लंके

advertisement

अहिल्यानगर दिनांक 29 ऑक्टोबर

अहिल्यानगर मतदार संघातून अखेर महाविकास आघाडीच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार म्हणून माजी महापौर अभिषेक कळमकर यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. अहिल्यानगर जिल्ह्याचे दक्षिण भागाचे खासदार निलेश लंके यावेळी त्यांच्यासोबत होते.

गेल्या अनेक दिवसांपासून महाविकास आघाडी कडून कोण उमेदवार राहणार यावर बरेच खलबत्या झाली शेवटपर्यंत ही जागा कोणाला सुटणार आणि उमेदवार कोण राहील याची उत्सुकता अनेक जणांना होती. अखेर ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाला गेली आणि माजी महापौर अभिषेक कळमकर यांना उमेदवारी देण्यात आली. ही उमेदवारी जाहीर झाल्यानंतर महाविकास आघाडीमधील घटक पक्ष असलेल्या उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेने बंडाचे निशाण फडकवले होते. आज शिवसेनेच्या वतीने माजी महापौर भगवान फुलसुंदर यांनी अर्ज दाखल केला आता चार तारखेपर्यंत बंडोबा थंडोबा होतील का याकडेच महाविकास आघाडीला लक्ष द्यावे लागेल.

अहमदनगर महानगरपालिकेचे महापौर म्हणून अभिषेक कळमकर यांनी आपली राजकीय कारकीर्द सुरू केली होती त्याचबरोबर त्यांच्याबरोबर अनुभवी असे त्यांचे काका माजी आमदार दादाभाऊ कळमकर यांची अनुभवाची साथ लाभणार आहे. कार्यकर्त्यांचा विश्वास यावर आपण निवडणुकीच्या रिंगणात निश्चित विजयी होऊ शहरातील दहशत, गुंडागर्दी, अवैध धंदे बंद करून नगर विकासाकडे आणि औद्योगिक प्रगतीकडे कसे जाईल या मुद्द्यावर या निवडणुकीत आपण जनतेसमोर जाणार आहोत अशी प्रतिक्रिया अभिषेक कळमकर यांनी दिली आहे.

तर महाविकास आघाडी कडून अभिषेक कळमकर यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर आज निलेश लंके यांनी त्यांच्यासोबत येऊन उमेदवारी अर्ज दाखल केला नगरकरांनी आता अभिषेक कळमकर यांचा आमदारकीचा अभिषेक घालायचा ठरवले असल्यामुळे यावर्षी निश्चितच बदल होणार आहे. महाविकास आघाडीचा लोकसभेपासून सुरू झालेला झंजावात विधानसभेतही सुरू राहणार असून अभिषेक कळमकर यांना निश्चितच नगरकर मोठ्या मताधिक्याने विजयी करतील अशी प्रतिक्रिया खासदार निलेश लंके यांनी दिली.

आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस असल्यामुळे उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी तहसील कार्यालयात मोठी गर्दी होती आणि विशेष म्हणजे महाविकास आघाडीचे उमेदवार आणि बंड केलेले शिवसेनेचे उमेदवार एकत्रच तहसील कार्यालयात आले होते. मात्र आता महाविकास आगरी मधील बंड वरिष्ठांना लवकरात लवकर संपवावे लागेल अन्यथा निवडणुकीला फार कमी काळ राहिला असून उमेदवारालाही प्रचारासाठी मोठी मेहनत घ्यावी लागणार आहे त्यामुळे बंडोबा लवकरच थांडोबा करावे लागतील.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular