Home शहर कल्याण रोड विद्या कॉलनी येथे  शिवसेना जिल्हाप्रमुख, नगरसेवक अनिल शिंदे यांच्या प्रयत्नातून...

कल्याण रोड विद्या कॉलनी येथे  शिवसेना जिल्हाप्रमुख, नगरसेवक अनिल शिंदे यांच्या प्रयत्नातून बंद पाईप गटार कामाचा शुभारंभ संपन्न

अहमदनगर दि.१५ नोव्हेंबर –
कल्याण रोड परिसर हा नगर शहराच्या अत्यंत जवळचा परिसर आहे त्यामुळे या भागामध्ये मोठ्या प्रमाणात नागरी वसाहती निर्माण झाल्या आहेत तरी या परिसरातील विकासाचे प्रश्न नियोजन पद्धतीने सोडविण्याचे काम सुरू आहे या भागातील ड्रेनेज लाईन चा प्रश्न गंभीर बनला होता त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला होता तो सोडविण्यासाठी बंद पाईप गटार कामे हाती घेऊन बहुतांश भागातील कामे पूर्ण केले आहेत टप्प्याटप्प्याने जमिनी अंतर्गातील सर्व कामे पूर्ण केली जातील कल्याण रोड परिसरातील रस्त्यांच्या विकास कामासाठी मोठा निधी प्राप्त झाला आहे उर्वरित रस्त्यांसाठीही राज्य शासनाकडून मोठा निधी मंजूर करून आणला जाणार आहे त्या माध्यमातून कल्याण रोड परिसर हा विकास कामातून मॉडेल बनवणार आहे असे प्रतिपादन शिंदे गट शिवसेना जिल्हाप्रमुख, नगरसेवक अनिल शिंदे यांनी केले.
कल्याण रोड विद्या कॉलनी येथे शिवसेना जिल्हाप्रमुख,नगरसेवक अनिल शिंदे यांच्या प्रयत्नातून बंद पाईप गटार कामाचा शुभारंभ मा. प्राचार्य खासेराव शितोळे यांच्या हस्ते संपन्न झाले यावेळी पारुनाथ ढोकळे, विजय गाडळकर, संतोष दसासे, श्रीकांत येवले,भगवान काटे, मुन्ना शिंदे, ॲड.गजानन गटणे, रमेश कासार,गोरख गवळी, दत्तात्रय कानडे, संजय भालेराव, विशाल चत्तर,भालचंद्र फटांगरे, बाळासाहेब निमसे, राजाराम रोहकले, संभाजी तांबे,प्रकाश बर्वे, रामदास गायकवाड, नवनीत गायकवाड,बाबासाहेब महानवर, राम कोतकर, आदिनाथ आगरकर, ओंकार शिंदे,गवराम कदम, वैभव चत्तर,महेश केदार, सतीश शहाणे, बाळासाहेब ठुबे,प्रा. भवाळ,श्री दिवटे आदी उपस्थित होते.
यावेळी मा.प्राचार्य खासेराव शितोळे म्हणाले की, कल्याण रोडच्या विकास कामांना सुरुवात झाली आहे एक एक प्रश्न मार्गी लागत आहे पाण्याचा गंभीर प्रश्नही सुटण्याच्या मार्गावर आहे नगरसेवक अनिल शिंदे यांनी या भागामध्ये मोठ्या प्रमाणात बंद पाईप गटार कामे पूर्ण केली आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न मार्गी लागला आहे रस्त्याची कामे ही पूर्ण करून देण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे सर्वांच्या सहकार्यातूनच कल्याण रोडच्या विकासाला चालना मिळाली आहे असे ते म्हणाले.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version