Homeजिल्हाकर्डिलेंचा प्रचार करत असल्याने धनगर समाजाचे नेते अण्णासाहेब बाचकर यांना फोनवरून धमकी ...

कर्डिलेंचा प्रचार करत असल्याने धनगर समाजाचे नेते अण्णासाहेब बाचकर यांना फोनवरून धमकी  माजी खासदार प्रसाद तनपुरेंंची ऑडिओ क्लिप व्हायरल 

advertisement

राहुरी – राहुरी विधानसभा मतदारसंघात प्रचार शिगेला पोहोचला असताना उमेदवाराच्या समर्थकांना धमकावण्याचे प्रकार सुरू झाले आहेत.‌ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उमेदवार विद्यमान आमदार प्राजक्त तनपुरे यांचे वडील माजी खा. प्रसाद तनपुरे यांनी धनगर समाजाचे नेते अण्णासाहेब बाचकर यांना फोनवरून धमकी दिल्याच्या संभाषणाची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. या प्रकरणाचा भाजपा पदाधिकाऱ्यांनी निषेध केला आहे. बाचकर हे भाजपचे उमेदवार माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांच्या प्रचारात आघाडीवर आहेत.

राहुरी विधानसभा मतदारसंघात तीव्र राजकीय घमासान सुरू आहे. आ.प्राजक्त तनपुरे यांचे वडील माजी खा. प्रसाद तनपुरे यांनी धनगर समाज नेते अण्णासाहेब बाचकर यांना फोनवरून धमकी दिल्याची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. ‘तू तुझ्या पुढच्या भवितव्याचा विचार करून ठेव, इतकं सोपं नाही आता तनपुरेंच्या विरोधात जाणं. तुला सांगून ठेवतो, इथून पुढे कोणी काही केलं तर माफ करणार नाही, कोण काय करतो ते आता मी पाहतो. तुझी संघटना गेली खड्ड्यात, तो कर्डिले काय तुझ्या संघटनेचा आहे का? तुझ्या जवळचा कोण आहे? उद्या काही झालं की, तू माझ्या दरवाज्यावर येतो. इतका मोठा झाला का?, आता दादाचा प्रचार करायचा हे लक्षात ठेव नाही तर तू आणि तुझी पक्ष संघटना पाहून घेतो, अशा प्रकारे धमकावण्याचा प्रयत्न केल्याचा दावा भाजप कार्यकर्त्यांकडून केला जात आहे. प्रचारादरम्यान कर्डिले यांच्यावर गुंडगिरीचे आरोप तनपुरे समर्थकांकडून केले जात आहेत. आता सुसंस्कृत म्हणवून घेणाऱ्या तनपुरे यांनीच सामान्य कार्यकर्त्याला धमकवण्याचा प्रयत्न केल्याने कार्यकर्त्यांनी निषेध व्यक्त केला असून तनपुरे यांच्या पायाखालची वाळू सरकल्यानेच अशा प्रकारे दहशत करून धमकावण्याचे प्रकार सुरू झाले आहेत, असेही भाजपा तालुकाध्यक्ष सुरेश बानकर व जिल्हा उपाध्यक्ष अमोल भनगडे यांनी म्हटले आहे.
या संभाषणाचे पुष्टी आम्ही करत नाही
हे संभाषण पत्रकार परिषदेमध्ये दिलेली संभाषण क्लीप आहे 👇
AUD-20241113-WA0020

राहुरी विधानसभा मतदार संघातील महायुतीचे उमेदवार शिवाजीराव कर्डिले यांचा प्रचार करत असताना माजी खा. प्रसाद तनपुरे व उमेदवार आ. प्राजक्त तनपुरे यांचे वडील यांनी मला फोनवर धमकी देत म्हणाले की तनपुरेंच्या विरोधात जाणे इतक सोपे नाही, तुला समजून सांगतो तू प्राजक्तचे काम कर नाहीतर शांत बस अशी धमकी दिली असून माझ्या जीवाला तनपुरे यांच्याकडून धोका आहे तरी याबाबत पोलीस स्टेशनला तक्रार करून संरक्षण मागणार आहे अशी माहिती धनगर समाजाचे नेते कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती अण्णासाहेब बाचकर यांनी दिली

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular